बिअरची बाटली अन् हॉकीस्टिकनं दोघांचं डोकं फोडलं; अंडा आम्लेट गाड्यांवर राडा

By विलास जळकोटकर | Published: July 24, 2023 06:55 PM2023-07-24T18:55:46+5:302023-07-24T18:56:12+5:30

रविवारच्या रात्री यातील जखमी दोघे अंडा आम्लेटच्या गाड्यावर नाश्त्यासाठी उभे होते.

A beer bottle and a hockey stick hit on the head to injured | बिअरची बाटली अन् हॉकीस्टिकनं दोघांचं डोकं फोडलं; अंडा आम्लेट गाड्यांवर राडा

बिअरची बाटली अन् हॉकीस्टिकनं दोघांचं डोकं फोडलं; अंडा आम्लेट गाड्यांवर राडा

googlenewsNext

सोलापूर : अंडा आम्लेटच्या गाड्यांवर किरकोळ कारणावरुन बाचाबाची होऊन पाचजणांच्या जमावानं दोघांना बिअरची बाटलई, हॉकीस्टिकनं डोक्यावर, पाठीवर बेदम मारहाण करुन जखमी केले. रविवारी रात्री आठच्या सुमारास स्टेशन रोडवर ही घटना घडली. प्रदीप यलप्पा जाधव (वय- ४८, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नं. ६ सोलापूर), नागेश शावरप्पा गायकवाड (वय- २९, रा. होटगी, ता . द. सोलापूर) अशी जखमींची नावे आहेत.

रविवारच्या रात्री यातील जखमी दोघे अंडा आम्लेटच्या गाड्यावर नाश्त्यासाठी उभे होते. यावेळी करण जाधव, मनोज जाधव यांच्यासह पाचजण तेथे आले. येथे किरकोळ कारणावरुन झालेल्या बाचाबाचीत जमावातील लोकांनी बिअरची बाटली डोक्यावर फोडली, दुसऱ्यानं हॉकीस्टिकनं तोंडावर, पाठीवर मारुन दोघांना जखमी केले. दोघांनाही सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद आहे.

Web Title: A beer bottle and a hockey stick hit on the head to injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.