अंध मुलीला रस्ता ओलांडण्याच्या बहाण्याने नेले अन् केला लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 01:22 PM2022-06-02T13:22:33+5:302022-06-02T13:45:59+5:30
Sexually Assauling : ही घटना दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी ट्विट करून उघडकीस आणली आणि तिला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे.
दिल्लीतील डाबरी परिसरात एका अंध मुलीवर अज्ञात व्यक्तीने लैंगिक अत्याचार केला. दोन ते तीन दिवसांपूर्वी घडलेली ही घटना दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी ट्विट करून उघडकीस आणली आणि तिला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे.
स्वाती यांनी ट्विटमध्ये मालीवाल यांनी लिहिले की, "२५ मे रोजी एका अंध मुलीला चुकून दुसऱ्या बस स्टॉपवर उतरवले. नंतर एका व्यक्तीने तिला रस्ता ओलांडण्यास मदत करण्याच्या बहाण्याने तिला रस्त्यावर नेले पण तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली आहे. मी मुलीला भेटले आणि आम्ही तिला पूर्णपणे मदत करत आहोत. पण खरंच माणसाच्या दुष्कृत्याला काही मर्यादा आहे की नाही!"
पोलीस रुग्णालयात पोहोचले जिथे मुलीने अज्ञात व्यक्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं सांगितलं. तिच्या वक्तव्याच्या आधारे, भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ अंतर्गत डाबरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तांत्रिक पुराव्याच्या मदतीने आरोपीला पकडून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, असा खुलासा द्वारकाचे पोलीस उपायुक्त शंकर चौधरी यांनी केला.