पन्नास हजारांच्या कर्जासाठी सोसला दीड लाखांचा भार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 12:31 PM2023-08-29T12:31:46+5:302023-08-29T12:32:04+5:30
उलवे येथे राहणाऱ्या चांद शेख (४४) यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे.
नवी मुंबई : कर्जाच्या बहाण्याने एकाची दीड लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रिलायन्स कंपनीकडून ५० हजारांचे कर्ज मंजूर झाले असल्याचे या व्यक्तीला सांगण्यात आले होते. त्यानंतर वेगवेगळ्या प्रक्रियेच्या बहाण्याने त्यांच्याकडून तब्बल दीड लाख रुपये उकळण्यात आले.
उलवे येथे राहणाऱ्या चांद शेख (४४) यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. चार महिन्यांपूर्वी त्यांनी फेसबुकवर रिलायन्सच्या नावाने जाहिरात बघितली होती. त्यानंतर काही वेळातच त्यांना फोनवर एका व्यक्तीने तो रिलायन्समधून बोलत असून, शेख यांना ५० हजारांचे कर्ज मंजूर झाले असल्याचे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून शेख यांनी त्याने वेगवेगळ्या प्रक्रियेच्या नावाखाली अनेकदा पैसे मागितले ते दिले.शेख यांनीकर्जासाठी तब्बल दीड लाख रुपये संबंधितांच्या खात्यावर पाठवले.