एका चोरीच्या तपासात अटक अन् उघड झाले सहा गुन्हे; नागपुरातील प्रकार
By योगेश पांडे | Updated: March 10, 2024 17:58 IST2024-03-10T17:52:49+5:302024-03-10T17:58:04+5:30
पारडी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली

एका चोरीच्या तपासात अटक अन् उघड झाले सहा गुन्हे; नागपुरातील प्रकार
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: एका चोरीच्या तपासात अटक झाल्यानंतर आरोपींनी सहा ठिकाणी गुन्हे केल्याची बाब उघड झाली. पारडी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
देवीप्रसाद जामुनपानी (४५, अंबेनगर) हे १३ फेब्रुवारी रोजी घराला कुलूप लावून कुटुंबियांसह मध्यप्रदेशातील बालाघाट येथे गेले होते. चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडत आत प्रवेश केला व ९७ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. जामुनपानी यांच्या तक्रारीवरून पारडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही व तांत्रिक माध्यमातून तपास सुरू केला. तपासादरम्यान यात मोहम्मद फय्याज एजाज अन्सारी (२२, गंगाबाग, पारडी), अफरोज शमशाद अन्सारी (२२, गिरजा नगर, भांडेवाडी) यांचा सहभाग असल्याची बाब समोर आली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्यांनी घरफोडीची कबुली दिली. त्यांची आणखी सखोल चौकशी केली असता त्यांनी नागपुरात वाठोड्यात एक वाहनचोरी, नंदनवन व कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, कुही मध्ये बिअर बार फोडणे व मोटारसायकल चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून मोटारसायकल जप्त करण्यात आली.