मसाज स्पाच्या नावाखाली अश्लील कृत्य करणाऱ्या ६ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 06:49 PM2023-03-11T18:49:32+5:302023-03-11T18:49:50+5:30

मीरारोड - मीरारोड बेव्हिल पार्कच्या मुकुंद रितु इमारतीत चालणाऱ्या डिवाईन स्पा ऍण्ड वेलनेसमध्ये मसाज - स्पाच्या आड अश्लील प्रकार चालत असल्या ...

A case has been registered against 6 persons who committed obscene acts in the name of massage spa | मसाज स्पाच्या नावाखाली अश्लील कृत्य करणाऱ्या ६ जणांवर गुन्हा दाखल

मसाज स्पाच्या नावाखाली अश्लील कृत्य करणाऱ्या ६ जणांवर गुन्हा दाखल

googlenewsNext

मीरारोड - मीरारोड बेव्हिल पार्कच्या मुकुंद रितु इमारतीत चालणाऱ्या डिवाईन स्पा ऍण्ड वेलनेसमध्ये मसाज - स्पाच्या आड अश्लील प्रकार चालत असल्या प्रकरणी भाईंदरच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षने कारवाई करून ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे . 

पोलीस निरीक्षक समीर अहिरराव यांना , सदर स्पा मध्ये काम करणाऱ्या तरुणीं मार्फत जास्त पैश्यांसाठी आलेल्या गिऱ्हाईकांना अश्लील कृत्याची सेवा दिली जाते. अहिरराव सह उमेश पाटील, विजय निलंगे, रामचंद्र पाटील,  केशव शिंदे, अश्विनी भिलारे, सम्राट गावडे, सोनाली मोरे यांच्या पथकाने सापळा रचला. बोगस गिऱ्हाईक पाठवून माहितीची खात्री पटताच पथकाने छापा टाकला. स्पा मध्ये एक मुलगी बोगस गिहाईकाशी अश्लील चाळे करताना सापडली. स्पाचा चालक अभिजीत दास व मॅनेजर ललरुथफेरी सह ४ तरुणीं वर मीरारोड पोलीस ठाण्यात ८ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: A case has been registered against 6 persons who committed obscene acts in the name of massage spa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.