जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या PFI च्या 60 ते 70 जणांवर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 09:03 AM2022-09-24T09:03:22+5:302022-09-24T11:24:58+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या PFI च्या 60 ते 70 जणांवर गुन्हे दाखल

A case has been registered against 60 to 70 workers of Popular Front of India in Pune | जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या PFI च्या 60 ते 70 जणांवर गुन्हे दाखल

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या PFI च्या 60 ते 70 जणांवर गुन्हे दाखल

Next

किरण शिंदे

पुणे - PFI संघटनेच्या राज्यस्तरीय नेत्यांना NIA, ED  या केंद्रीय तपास यंत्रणेने अटक केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या 60 ते 70 जणांवर पुणे पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शुक्रवारी हे आंदोलन करण्यात आले होते. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रिजाज जैनुद्दीन सय्यद (वय 26, शिवनेरी नगर कोंढवा खुर्द) याच्यासह 60 ते 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादवी 141 143 145 147 149 188 341 सह मपोका 37/1/3 सह 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार नवनाथ डांगे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेकायदेशीर जमा करून आंदोलन केले. NIA, ED या केंद्रीय तपास यंत्रणेने पीएफआयच्या राज्यस्तरीय नेत्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ आरोपींनी मोठमोठ्याने घोषणा देत रस्ता अडवला. त्यात पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबरचे नारे देण्यात आले. येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना व वाहनांना अडथळा निर्माण करून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. बंड गार्डन पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Web Title: A case has been registered against 60 to 70 workers of Popular Front of India in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.