बनावट अभिलेख तयार करून फेरफार रद्द करणे अंगलट, दोन तलाठ्यासंह मंडळ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

By अनिल गवई | Published: January 9, 2024 10:20 PM2024-01-09T22:20:41+5:302024-01-09T22:20:48+5:30

या घटनेमुळे शेगावसह खामगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

A case has been registered against Anglat, two Talathas and board officials for creating fake records and canceling the alterations | बनावट अभिलेख तयार करून फेरफार रद्द करणे अंगलट, दोन तलाठ्यासंह मंडळ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

बनावट अभिलेख तयार करून फेरफार रद्द करणे अंगलट, दोन तलाठ्यासंह मंडळ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

खामगाव : शेत जमिनीच्या फेरफारसाठी तात्पुरता मनाई हुकूमचा आदेश असताना मंडळ अधिकारी, दोन तलाठी आणि आणखी एकाने बनावट अभिलेख तयार केला. फेरफारच्या नमुना ९ आणि १२ नोटीसवर खोट्या स्वाक्षरी केल्याप्रकरणी शेगाव ग्रामीण पोलिसांनी संबंधितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे शेगावसह खामगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

तक्रारीनुसार, रोकडीया नगर शेगाव येथील राम भीमराव पांडे (६७) यांनी गायगाव बु। येथे गट नं ८ ब क्षेत्रफळ ३ हेक्टर २४ आर १०.२८ पैकी हिस्सा सालीम ही सदाशिव नारायण वरघट (रा. सुटाळपुरा खामगाव) यांचेकडून रजिस्टर दस्ताने २२ फेब्रुवारी २००५ नुसार विकत घेतली. त्यानंतर तक्रारदार यांनी विकत घेतलेल्या शेत जमिनीचा फेरफार घेण्यासाठी तत्कालीन तलाठ्यांकडे अर्ज दिला. त्यावेळी त्यांनी जिगाव प्रकल्पामुळे परवानगीची आवश्यकता असल्याचे सांगून फेरफार घेतला नाही. दरम्यान, प्रकल्प कार्यालयाच्या परवानगीची गरज नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर तक्रारदाराला फेरफार क्रमांक ७८१ प्रमाणे नियमानुसार देण्यात आला. 

दरम्यान, तत्कालीन मंडळ अधिकारी यांनी २१ ऑगस्ट २००७ रोजी घेण्यात आलेला फेरफार गैरकायदेशीरपणे तहकूब करून रद्द केला. याबाबत कोणतीही सूचना देण्यात नसल्याने तक्रारदार पांडे यांनी पुन्हा ०६ सप्टेंबर २०११ रोजी तलाठी ठोंबरे यांच्याकडे फेरफार होण्यासाठी अर्ज दिला. तलाठी ठोंबरे यांनी तक्रारदाराला कारवाईपासून अनभिज्ञ ठेवले. तितक्यात सदाशिव वरघट व त्याची दोन मुले तक्रारदाराला शेताचे ताब्यात अडथळा निर्माण करीत होते. त्यामुळे तक्रारदारांनी वरघट यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली. 

त्यावर न्यायालयाने सदाशिव वरघट व त्यांचे मुलाविरुद्ध तात्पुरता मनाई हुकूमचा आदेश दिला, असे असतानाही मंडळ अधिकारी आणि इतर आरोपींनी संगनमताने नमुना ९ आणि १२ च्या नोटीसवर तक्रारदाराच्या खोट्या स्वाक्षरी करून बनावट अभिलेख अस्तित्वात आणला. त्याद्वारे फौजदारी स्वरूपाचा कट रचून फेरफार रद्द केल्याचे न्यायालयात लेखी दिले. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने तलाठी सुनील ठोंबरे, मंडळ अधिकारी के.बी.मोरे, तलाठी कैलास वरघट आणि सदाशिव नारायण वरघट (रा. खामगाव) यांच्याविरोधात भादंवि कलम १२० (ख) १६६, १६७, १९३, ४१७, ४१८, ४१९, ४६५, ४६६, ४६८, ४७१, सहकलम ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पुढील तपास पोउपनि शिंदे करीत आहेत.
 

Web Title: A case has been registered against Anglat, two Talathas and board officials for creating fake records and canceling the alterations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.