महावितरणच्या पथकाला मारहाण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

By अनिकेत घमंडी | Published: January 23, 2023 06:26 PM2023-01-23T18:26:06+5:302023-01-23T18:27:38+5:30

याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे महावितरणने सोमवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले. 

A case has been registered against the person who assaulted the team of Mahavitaran | महावितरणच्या पथकाला मारहाण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

महावितरणच्या पथकाला मारहाण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

Next

डोंबिवली : थकबाकीपोटी खंडित केलेला वीजपुरवठा सुरू आढळल्याने कारवाई करणाऱ्या पथकातील बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना डोंबिवलीतील आजदे गाव येथे घडली आहे. तर पथकातील महिला विद्युत सहायकालाही शिवीगाळ करण्यात आली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे महावितरणने सोमवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले. 

नागेश धर्मदास गमरे समर्थ दर्शन बिल्डिंग, बी-४०३, हनुमान मंदिराजवळ, आजदे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. महिला विद्युत सहायक विजया भुयारकर या बाह्यस्त्रोत कर्मचारी आकाश गिरी याच्यासह आजदे परिसरात तपासणीचे काम करत होत्या. रघुनाथ बाळकु आवटे या ग्राहकाचा वीजपुरवठा थकबाकीपोटी खंडित करण्यात आला होता. मात्र, याठिकाणी परस्पर केबल जोडून वीजपुरवठा सुरू असल्याचे आढळून आले. 

त्यानुसार कारवाई करताना भाडेकरू असणाऱ्या आरोपी गमरे याने बाह्यस्त्रोत कर्मचारी आकाश गिरी यांना मारहाण केली व महिला विद्युत सहायक भुयारकर यांना शिविगाळ केली. भुयारकर यांच्या फिर्यादीवरून मानपाडा पोलिसांनी गमरे विरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहे. महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण व दमदाटीच्या गुन्ह्यात जबर शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा न आणता सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Web Title: A case has been registered against the person who assaulted the team of Mahavitaran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.