खारफुटीची कत्तल करणाऱ्यावर गुन्हा दाखल
By सूर्यकांत वाघमारे | Published: September 15, 2022 08:36 PM2022-09-15T20:36:20+5:302022-09-15T20:36:46+5:30
वाघिवली मधील प्रकार, पाहणीमध्ये आला होता प्रकार उघड
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: खाडीकिनारी भागात खारफुटीची कत्तल करून मासेमारीसाठी तलाव निर्माण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनअधिकारी यांच्या पाहणी मध्ये हा प्रकार समोर आला होता. त्यानुसार एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खाडीकिनारी सिडकोचा ताबा असलेल्या भागात काही दिवसांपूर्वी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. त्यामध्ये वाघिवली गावात खाडीकिनारी मासेमारी साठी तयार केलेला तलाव दिसून आला होता. त्यासाठी शंभर हुन अधिक कांदळवणाची कत्तल करण्यात आली होती. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता, संबंधित व्यक्तीने तो तलाव याच्या मालकीचा असल्याचे सांगितले होते. यामुळे सिडकोकडे चौकशी केली असता ते क्षेत्र अद्यापही सिडकोच्या ताब्यात असल्याचे समोर आले. त्यानुसार वनपरीक्षेत्र अधिकारी बापू गडदे यांनी एनआरआय पोलिसांकडे तक्रार केली होती. त्याद्वारे बुधवारी कुंदन भोईर विरोधात कांदळवणाची कत्तल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.