मित्राच्या वाढदिवसानंतर घरी निघालेल्या तरुणावर चॉपरने वार; तिघांवर गुन्हा दाखल

By शिवाजी पवार | Published: May 20, 2023 02:23 PM2023-05-20T14:23:17+5:302023-05-20T14:24:34+5:30

पोलिसांनी समीर पठाण, शोएब कुरेशी व जावेद शहा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

A case has been registered against three people who stabbed a young man with a chopper, and the search is on | मित्राच्या वाढदिवसानंतर घरी निघालेल्या तरुणावर चॉपरने वार; तिघांवर गुन्हा दाखल

मित्राच्या वाढदिवसानंतर घरी निघालेल्या तरुणावर चॉपरने वार; तिघांवर गुन्हा दाखल

googlenewsNext

शिवाजी पवार

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : मित्राचा वाढदिवस साजरा करून रात्री घरी चाललेल्या तरुणावर तिघा जणांनी चॉपरने वार करून खुनाचा प्रयत्न केला. जखमी तरुणावर शहरातील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी महेश मुकुंद शहाणे (वय २३, रा. गोंधवणी, श्रीरामपूर) या जखमी तरुणाने फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी समीर पठाण, शोएब कुरेशी व जावेद शहा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.   

शुक्रवारी रात्री शहरातील बसस्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये मित्राचा वाढदिवस साजरा करून महेश हा दुचाकीवरून गोंधवणी येथील घरी चालला होता. त्यावेळी रेल्वे मार्गाच्या बाजूला उभा असलेल्या समीर पठाण याने मला थांबवून दुचाकी बाजूला घ्यायला सांगितली. जवळील मोकळ्या जागेत नेले. तेथे त्याचे मित्र शोएब व जावेद हे आले. त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. चॉपरने वार करत खुनाचा प्रयत्न केला. तशा स्थितीत मी तेथून पळ काढला. त्यानंतर मित्राला फोन करून बोलावून घेतले, असे महेश याने फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

Web Title: A case has been registered against three people who stabbed a young man with a chopper, and the search is on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.