भाऊ प्रिय असेल तर दोन लाख दे..नाहीतर त्याची गोळ्या झाडून हत्या करू; दोघांविरूध्द खंडणीचा गुन्हा

By सागर दुबे | Published: April 10, 2023 02:10 PM2023-04-10T14:10:11+5:302023-04-10T14:10:25+5:30

तालुका पोलिसांकडून संशयितांना अटक

A case has been registered in Jalgaon against two people who demanded extortion by threats. | भाऊ प्रिय असेल तर दोन लाख दे..नाहीतर त्याची गोळ्या झाडून हत्या करू; दोघांविरूध्द खंडणीचा गुन्हा

भाऊ प्रिय असेल तर दोन लाख दे..नाहीतर त्याची गोळ्या झाडून हत्या करू; दोघांविरूध्द खंडणीचा गुन्हा

googlenewsNext

जळगाव : तुझा भाऊ प्रिय असेल तर दोन दिवसाच्या आत आम्हाला दोन लाख रूपये दे.., नाहीतर तुझा भावाची भर चौकात गोळ्या झाडून हत्या करण्यात येईल, अशी धमकी देवून भगवान भावलाल कोळी (४३, रा. विदगाव) यांना खंडणी मागितल्याचा प्रकार रविवारी दुपारी १.१० वाजेच्या सुमारास विदगाव येथे घडला. याप्रकरणी पोलिसांनी रविवारी मध्यरात्री अनिल उर्फ बंडू भानुदास कोळी (३२) व सचिन रतन सोनवणे (२५, दोन्ही रा. विदगाव) या दोन संशयितांना अटक केली असून त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.

विदगाव येथे भगवान कोळी हे कुटूंबासह वास्तव्यास असून रविवारी दुपारी त्यांच्या घरी अनिल कोळी व सचिन कोळी हे दोघं आले. तुझा भाऊ बिल्डरशिपचा व्यावसाय करतो. तू देखील आता कपाशी व गहू विक्री केला आहे. तुमच्याकडे पैसे खूप आहेत. तुझा भाऊ जनार्दन कोळी हा अंगात सोने घालून फिरतो. एखाद्यावेळी त्याला बंदुकीच्या गोळ्या झाडून जीवे ठार मारू आणि दागिने लुटून घेवू. जर तुला भाऊ प्रिय असेल तर दोन दिवसाच्या आत आम्हाला दोन लाख रूपये दे. नाहीतर तुझा भावाची भर चौकात गोळ्या झाडून हत्या करू, अशी धमकी दोघांनी भगवान कोळी यांना दिली.

त्यानंतर त्यांना दोघांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. काही वेळानंतर कोळी यांनी घरातून काढता पाय घेवून पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर तालुका पोलिस ठाण्यात येवून तक्रार दिली. त्यानुसार खंडणी मागितल्याप्रकरणी अनिल कोळी व सचिन सोनवणे याच्याविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, रात्रीच तालुका पोलिसांनी दोघांचा शोध घेवून अटक केली आहे. पुढील तपास वासुदेव मराठे हे करीत आहेत.

Web Title: A case has been registered in Jalgaon against two people who demanded extortion by threats.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.