उल्हासनगरात ४ कोटी ४३ लाखाची फसवणूक बापलेकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 01:44 PM2022-06-03T13:44:07+5:302022-06-03T13:45:12+5:30

याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

A case of fraud of Rs 4 crore 43 lakh has been registered against Bapleka in Ulhasnagar | उल्हासनगरात ४ कोटी ४३ लाखाची फसवणूक बापलेकावर गुन्हा दाखल

उल्हासनगरात ४ कोटी ४३ लाखाची फसवणूक बापलेकावर गुन्हा दाखल

googlenewsNext

सदानंद नाईक

उल्हासनगर : कॅम्प नं-१ परिसरात राहणारे दीपक टेकवानी यांचा विश्वास संपादन केल्यानंतर, व्यावसायिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या मंजुनाथ व मनरुप आचार्य या बापलेकांनी ४ कोटीं ४३ लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

उल्हासनगरातील व्यापारी दीपक टेकवानी यांचा विश्वास संपादन केल्यानंतर, मंजुनाथ आचार्य व मनरुप आचार्य या बापलेकांनी संगनमत करून सन २०११ पासून व्यावसायिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान ३ कोटी ८३ लाख ८४६ रुपये शिल्लक मालाचे तसेच टेकवानी यांच्या पत्नी व मुलगा यांच्याकडून कर्जापोटी घेतलेले ६० लाख रुपये असे एकून ४ कोटी ८३ लाख ५४ हजार ८४ रुपयांची सन-२०११ पासून फसवणूक केल्याची तक्रार उल्हासनगर पोलीस ठाण्यात दिली. टेकवानी यांच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात आचार्य बापलेकावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
 

Web Title: A case of fraud of Rs 4 crore 43 lakh has been registered against Bapleka in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.