आईला गळा दाबून मारलं, मग स्वत: गळफास घेतला; चिठ्ठी वाचून सर्वांना धक्काच बसला!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 02:19 PM2022-02-09T14:19:18+5:302022-02-09T14:19:31+5:30
कोल्हापूरमधील धक्कादायक घटना
आष्टा : वयोवृद्ध आईचा गळा आवळून खून करीत मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी आष्टा येथील दत्त वसाहतीमध्ये घडला. रतन रामचंद्र कांबळे (वय ८०) व शशिकांत रामचंद्र कांबळे (४७) अशी मायलेकांची नावे आहेत. घटनास्थळी शशिकांत यांनी लिहिलेली चिठ्ठी मिळाली असून, त्यामध्ये ‘दम्याच्या विकाराने निराश असल्याने आत्महत्या करीत आहोत. वयोवृद्ध आईस सांभाळण्यास कोण नसल्याने तिलाही घेऊन जात आहे,’ असे म्हटले आहे.
शशिकांत यांचे वडील रामचंद्र व आई रतन दोघेही प्राथमिक शिक्षक होते. त्यांचे वडील, भाऊ, भावजय व बहिणीचे निधन झाले आहे. त्यांचे आष्ट्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर कापड दुकान आहे. मंगळवारी त्यांची पत्नी मुलांसह माहेरी गेली हाेती. दिवसभर घरी शशिकांत व त्यांची आई हे दाेघेच हाेते.
शशिकांत यांना दम्याचा आजार आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते तणावाखाली हाेते. या नैराश्यातून त्यांनी कॉटवर विश्रांती घेत असलेल्या आईचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून केला. यानंतर दुसऱ्या खोलीत जाऊन गळफास घेत आत्महत्या केल्याचे नातेवाइकांनी सांगितले.
तरुणी लहान भावाला बोलली, आईच्या बेडरुममध्ये झोप; त्यानंतर घरात होत्याचं नव्हतं झालं! https://t.co/v8h7pd26pz
— Lokmat (@lokmat) February 9, 2022