वाहन पार्किंग करण्यावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी; उदगीर येथील घटना

By राजकुमार जोंधळे | Published: September 13, 2022 05:33 AM2022-09-13T05:33:42+5:302022-09-13T05:35:19+5:30

उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही गटातील व्यक्तीविरोधत विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

A clashes between two groups over vehicle parking; Incident at Udgir, latur | वाहन पार्किंग करण्यावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी; उदगीर येथील घटना

वाहन पार्किंग करण्यावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी; उदगीर येथील घटना

Next

उदगीर (जि. लातूर ) : एका फरशीच्या दुकानासमोर वाहन पार्किंग करण्याच्या कारणावरुन दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना उदगीर शहरातील देगलूर रोडवर घडली. याबाबत उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. 

पोलिसांनी सांगितले, उदगीरमधील देगलूर रोडवर असलेल्या एका फरशीच्या दुकानासमोर नवाब मैनोदीन तांबोळी, अब्दुल मैनोद्यीन तांबोळी याच्यासह अन्य दोघा अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी मारुती शिवाजी जाधव याला दुकानासमोर आडवी लावलेली गाडी काढ म्हणून जबर मारहाण केली, असे तक्रारीत म्हटले आहे. तर नवाब मैनोद्यीनसाब तांबोळी (रा. मुक्रमाबाद ता. मुखेड जि. नांदेड) याला विकास शिवाजी जाधव आणि त्याचा भाऊ याच्यासह  इतर दोन अनोळखी व्यक्तींनी दगड, लोखंडी टामी आणि काठीने जबर मारहाण करत, हातातील घड्याळ, खिशातील एक लाख रुपये काढून घेतले. असे तक्रारीत म्हटले आहे.

याबाबत उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही गटातील व्यक्तीविरोधत विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केवळ शुल्लक कारणावरुन ही हाणामारीची घटना घडल्याचे पोलिसांनी सोमवारी सांगितले.

Web Title: A clashes between two groups over vehicle parking; Incident at Udgir, latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.