कापड व्यावसायिकास रॉडने मारहाण, दुकानातील काचाही फोडल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 05:39 PM2022-05-30T17:39:45+5:302022-05-30T17:40:14+5:30

Beaten Case :तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, दुर्गा टॉकिज परिसरातील घटना

A cloth merchant was beaten by a rod and shop glass was smashed | कापड व्यावसायिकास रॉडने मारहाण, दुकानातील काचाही फोडल्या

कापड व्यावसायिकास रॉडने मारहाण, दुकानातील काचाही फोडल्या

Next

वर्धा : कापड दुकानात तीन अज्ञात युवकांनी प्रवेश करुन दुकानमालकास रॉडने मारहाण करीत दुकानातील काउंटरवरील काचा फोडून नुकसान केले. ही घटना श्री फॅशन नामक दुकानात २९ रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

तुषार प्रमोद हांडे रा. बजाज लेआऊट पिपरी मेघे याचे श्री फॅशन नामक कपड्याचे दुकान आहे. रात्रीच्या सुमारास तीन अज्ञात युवक दुकानात आले आणि कपड्याच्या वाजवी किंमतीपेक्षा कमी भाव सांगून तुषारसोबत वाद सुरु केला. तुषारने हटकले असता त्याला शिवीगाळ केली. रात्री तुषार दुकान बंद करीत असताना तिघांपैकी एका आरोपीनी तुषारला रॉडने मारहाण केली. तसेच दोघांनी दुकानातील काउंटरवरील काचा फोडल्या. तसेच तुषारला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जर याची तक्रार पोलिसात दिली तर जिवे ठार मारेल, अशी धमकी दिली. याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Web Title: A cloth merchant was beaten by a rod and shop glass was smashed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.