किरकोळ कारणावरुन घनकचरा व्यवस्थापन विभागाचा ठेकेदार व माजी नगरसेवकावर कोयत्याने हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 10:29 PM2023-08-08T22:29:30+5:302023-08-08T22:29:44+5:30

किरण नामदेव शिंदे ( वय २३ वर्षे, रा.बावडा वेस नाका, माळीगल्ली, इंदापूर) असे आरोपीचे नाव आहे.

A contractor and a former corporator of the solid waste management department were attacked with a crowbar for a minor reason | किरकोळ कारणावरुन घनकचरा व्यवस्थापन विभागाचा ठेकेदार व माजी नगरसेवकावर कोयत्याने हल्ला 

किरकोळ कारणावरुन घनकचरा व्यवस्थापन विभागाचा ठेकेदार व माजी नगरसेवकावर कोयत्याने हल्ला 

googlenewsNext

इंदापूर  : किरकोळ कारणावरुन नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचा ठेकेदार व माजी नगरसेवकावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार शहरातील सावतामाळीनगरमधील बावडा वेस नाक्याजवळ आज ( दि.८) साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणातील आरोपीची पोलिसांबरोबर बाचाबाची झाल्याची ही चर्चा आहे. वृत्त लिहीपर्यंत इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्याचे काम सुरु होते.
    
किरण नामदेव शिंदे ( वय २३ वर्षे, रा.बावडा वेस नाका, माळीगल्ली, इंदापूर) असे आरोपीचे नाव आहे. त्याने केलेल्या हल्ल्यात सुधीर किसन पारेकर (वय ३० वर्षे, रा. वनगळी,ता.इंदापूर), राजेश हरीदास शिंदे ( वय ५४ वर्षे,रा. सावतामाळीनगर,इंदापूर) हे दोघेजण जखमी झाले आहेत. पारेकर यांच्या कपाळावर गंभीर दुखापत झाली आहे. तर शिंदे यांच्या दंडावर व हातावर जखम झाली आहे. या संदर्भात पारेकर यांच्या निकटवर्तीयांनी दिलेली माहिती अशी की, पारेकर हे नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे ठेकेदार म्हणून काम करतात. ते बावडा वेस नाक्यालगतच्या भागात डास निर्मुलनासाठी धुरळणीचे काम करुन घेत होते. 

आरोपी किरण शिंदे याने त्यांच्याकडे जावून धुरळणी यंत्र मागितले. यंत्र गरम झाल्याने ते देण्यास पारेकर यांनी नकार दिल्याने आरोपीने चिडून त्यांच्या कपाळावर कोयत्याने वार केला. त्या नंतर त्याच भागातील माजी नगरसेवक राजेश शिंदे यांनी यापूर्वी आपल्या वडीलांना केलेल्या शिवीगाळीचा राग धरुन आरोपीने, त्यांच्या ही हातावर व दंडावर कोयत्याने वार केले. ही घटना समजल्यानंतर आरोपीस पकडण्यात आलेल्या पोलिसांबरोबर देखील आरोपीची बाचाबाची झाली, असे वृत्त आहे. पारेकर यांच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

Web Title: A contractor and a former corporator of the solid waste management department were attacked with a crowbar for a minor reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.