बापरे! एक E-Mail अन् गमावले तब्बल ८ कोटी; जोडप्यानं रडत रडत सांगितला कटू अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 05:07 PM2022-01-21T17:07:44+5:302022-01-21T17:08:30+5:30
या जोडप्याला आलेल्या ई मेलमध्ये काहीही संशयास्पद वाटलं नाही कारण हा ई मेल त्यांच्या वकिलाच्या नावानं आला होता.
भारतामध्ये ऑनलाईन फ्रॉडचे अनेक किस्से ऐकले असतील पण ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे सायबर क्राईम(Cyber Crime) मधून अशी बातमी समोर आली आहे. जी ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. एका क्षणातच दाम्पत्याला ८ कोटींचा फटका लागला आहे. हे नुकसान केवळ ई-मेलमुळे झालं आहे. या घटनेनंतर या दाम्पत्याने रडत रडत त्यांच्यावर घडलेला प्रसंग सर्वांसोबत शेअर केला आहे.
Daily Mail रिपोर्टनुसार, कैसी आणि त्यांची पत्नी डेनिस एविल्स दोघंही स्वत:चं घर खरेदी करण्याच्या तयारीत होते. त्यासाठी दाम्पत्याने आयुष्याची पुंजी लावली. यावेळी दाम्पत्याला एक ईमेल आला. ज्यात घराचं डील फायनल करण्यासाठी १.१ मिलियन डॉलर म्हणजे ८ कोटी रुपये ट्रान्सफर करण्यासाठी सांगितले होते.
दाम्पत्याला संशय का आला नाही?
या जोडप्याला आलेल्या ई मेलमध्ये काहीही संशयास्पद वाटलं नाही कारण हा ई मेल त्यांच्या वकिलाच्या नावानं आला होता. त्यातसोबत या ई मेलमध्ये त्यांची सर्व खासगी माहितीही लिहिली होती. ई मेलवर ना केवळ वकिलाचे नाव होते तर कंपनीच्या लोगोचाही वापर करण्यात आला होता. त्याचसोबत यात सर्व कॉन्ट्रॅक्टची डिटेल होती. ज्यात दाम्पत्याने व्यवहाराच्या वेळी स्वाक्षरी केली होती.
सायबर क्राइमचा बळी
अशावेळी जेव्हा ई मेलवर घराच्या व्यवहारासंदर्भात अंतिम करण्यासाठी जोडप्याकडे पैशांची मागणी केली तेव्हा त्यांनी बँकेतून रक्कम ट्रान्सफर केली. परंतु त्यात गडबड झाली. जेव्हा जोडप्याने वकिलांना फोन करुन सांगितले की, पैसे ट्रान्सफर केले आहेत. तेव्हा वकिलाचं उत्तर ऐकून जोडप्याची झोप उडाली. वकिलाने सांगितले मी असा कुठलाही ईमेल पाठवला नाही ज्यात पैसे ट्रान्सफर करण्याची मागणी केली होती. तेव्हा जोडप्याला धक्का बसला त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पैसे मिळाले की नाही?
या घटनेनंतर जेव्हा एका स्थानिक वृत्तवाहिनीशी हे जोडपं बोलत होते तेव्हा त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. भावूक होत म्हणाले की, आम्हाला विश्वास नव्हता की आमचे पैसे परत मिळतील. परंतु जेव्हा आम्ही Money Transfer केल्यानंतर काही वेळात बँकेला याची सूचना दिली. तेव्हा बँक कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांचे खाते फ्रिज केले होते. परंतु ही रक्कम कट झाली. बँकेने ही रक्कम लवकरात लवकर परत मिळतील असा विश्वास दिला आहे. याबाबत पोलीस सध्या तपास करत आहेत.