मद्यपीने केला मोठ्या भावाचा खून; शहापूर येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 05:48 PM2023-04-03T17:48:29+5:302023-04-03T17:49:39+5:30

किरण नंदकिशोर धुर्वे (२३) असे आरोपीचे नाव आहे. किरणला दारूचे व्यसन जडले होते.

A drunkard killed his elder brother in shahapur | मद्यपीने केला मोठ्या भावाचा खून; शहापूर येथील घटना

मद्यपीने केला मोठ्या भावाचा खून; शहापूर येथील घटना

googlenewsNext

मोहन राऊत 

दारूच्या नशेत नेहमीप्रमाणे वाद घालत असलेल्या मोठ्या भावाचा धाकट्याने सब्बलच्या प्रहाराने खून केला. धामणगावातील शहापूर येथे रविवारी रात्री १० वाजता ही घटना घडली. महेंद्र नंदकिशोर धुर्वे (३०) असे मृताचे नाव आहे.

किरण नंदकिशोर धुर्वे (२३) असे आरोपीचे नाव आहे. किरणला दारूचे व्यसन जडले होते. व्यसनाधीन होऊन घरी परतल्यानंतर तो महेंद्रसोबत नेहमी वाद घालत असे. दारूमुळे पत्नी व दोन मुले त्याला सोडून माहेरी निघून गेले होते. रविवारी रात्री १० च्या सुमारास झालेल्या वादावादीत किरणने महेंद्राच्या डोक्यात सब्बल मारली. त्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडून तो जागीच मृत्युमुखी पडला. या घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचानामा केला व आरोपी किरणला अटक केली. 

मृत महेंद्र याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहेत. सोमवारी किरणला धामणगाव येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला धामणगाव दिवाणी फौजदारी न्यायालयाने एका दिवसाची कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास दत्तापूरचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे करीत आहेत.

Web Title: A drunkard killed his elder brother in shahapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.