दिल्लीच्या कुटुंबाला गोव्यात आला थरारक अनुभव; यापुढे कधीही न जाण्याची घेतली शपथ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 08:45 AM2023-03-15T08:45:37+5:302023-03-15T12:40:56+5:30

मॅनेजरने कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकण्याचा इशारा देत त्याला तिथून पळवले, तेथून निघून जात असताना आरोपी धमकावून निघून गेला

A family from Delhi has a thrilling experience in Goa; Vow to never go again | दिल्लीच्या कुटुंबाला गोव्यात आला थरारक अनुभव; यापुढे कधीही न जाण्याची घेतली शपथ

दिल्लीच्या कुटुंबाला गोव्यात आला थरारक अनुभव; यापुढे कधीही न जाण्याची घेतली शपथ

googlenewsNext

नोएडा - गोव्यात ज्या पर्यटक कुटुंबावर हल्ला झाला ते ग्रेनोच्या अल्फा 2 येथील रहिवासी आहेत. हल्ल्यात जखमी झालेले अनिल कुमार हे व्यापारी आहेत, त्यांचा मुलगा जतिन शर्मा याचे सेक्टर ३६ मार्केटमध्ये सलून आहे. पीडितेचे कुटुंब ग्रेनो येथील त्यांच्या घरी परतले आहे. रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मित्रांसह पर्यटक कुटुंबावर खुनाच्या उद्देशाने हल्ला केला होता. जतीनच्या शरीरावर सुमारे १०० टाके आले आहेत. गोवा पोलिसांनी यात गुन्हा नोंदवून एका आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर सोडून दिले, असा पीडित कुटुंबाचा आरोप आहे. 

हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी खेद व्यक्त करत आरोपींवर कारवाईचे आश्वासन दिले. यानंतर पोलिसांनी गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली. पीडित कुटुंबाने १० मार्च रोजी ग्रेनो येथे पोहोचून प्रकरण दिल्लीला हलवण्याची मागणी केली. गोव्यात केस प्रकरणी गेल्यास आपल्यावर हल्ला होऊ शकतो, अशी भीती कुटुंबाला आहे. जतीन शर्मा हे मॉडेल राहिले आहेत. इंस्टाग्रामवर त्याचे ८० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. 

आई सुमन शर्मा यांनी सांगितले की, आम्ही पती, मुलगा, भाऊ अश्विन शर्मा, मुलगी सोनिया शर्मा, रुपाली शर्मा, जावई शुभम शर्मा आणि जावयाचा धाकटा भाऊ ध्रुव शर्मा यांच्यासह गोव्याला गेलो होतो. गोव्यातील अंजुना येथील Spazio रिसॉर्टमध्ये ५ खोल्या बुक केल्या. ५ मार्चला गोव्यात पोहोचल्यावर त्यांना रिसॉर्टमध्ये केवळ तीन खोल्या देण्यात आल्या. मॅनेजरने दोन खोल्या नंतर देऊ असं म्हटलं. रुम आणि स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करण्यावरून एका कर्मचाऱ्याशी वाद झाल्याचा आरोप आहे. ते शिवीगाळ करू लागले. याबाबत त्यांनी रिसॉर्टच्या व्यवस्थापकाकडे तक्रार केली.

दुसऱ्या हॉटेलमध्ये जाण्यावरून हल्ला
मॅनेजरने कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकण्याचा इशारा देत त्याला तिथून पळवले, तेथून निघून जात असताना आरोपी धमकावून निघून गेला. तेव्हा कुटुंबाने मॅनेजरला सांगितले की आम्ही येथे सुरक्षित नाही आणि दुसऱ्या हॉटेलमध्ये जातो. त्यानंतर आम्ही कार बुक केली. कुटुंब रिसेप्शनवर पोहोचले तेव्हा त्यांना दिसले की चार स्कूटीवरून आलेले ८ ते १० लोक बाहेर उभे आहेत. अनुचित घटनेचा अंदाज घेत त्यांनी आतून व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांनी फोटो आणि व्हिडिओ बनवण्यास आक्षेप घेतला. कुटुंब दुसऱ्या हॉटेलमध्ये शिफ्ट होण्यासाठी रिसॉर्टच्या गेटवर पोहोचताच बाहेर उभ्या असलेल्या लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी जतीन शर्मा यांच्या अंगावर चाकूने वार केले. त्याला वाचवण्यासाठी आलेले जतीनचे वडील अनिल शर्मा यांच्या हातावरही चाकूने वार करण्यात आले, त्यांच्या हाताची नस कापली गेली. या हाणामारीत अश्विनी, रुपाली आणि शुभम हेही जखमी झाले.

हॉटेल कर्मचारी, पोलिस कोणीही मदत केली नाही
जतिन शर्मा यांनी सांगितले की, रिसॉर्टमधून काढलेल्या कर्मचाऱ्याने त्याच्या साथीदारांसह आमच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला. रिसॉर्टच्या रिसेप्शन परिसरात आमचे रक्त सांडले तरीही कर्मचाऱ्यांनी पोलिसांना आणि रुग्णवाहिकेलाही बोलावले नाही. अर्धा तास आम्ही तडफडत होतो. जतीनच्या आईने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलीस ठाणे ४०० मीटर अंतरावर असूनही अर्ध्या तासानंतर पोलीस आल्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्यांना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले. पोलिस ठाण्यात येऊन जबाब नोंदवा, असे पोलिसांनी सांगितले. अशा अवस्थेत तो पोलीस ठाणे गाठून आपले म्हणणे कसे नोंदवू शकतो, असे पीडितेच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. 

Web Title: A family from Delhi has a thrilling experience in Goa; Vow to never go again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा