डिनरनंतर कुटुंब झोपी गेले अन् सकाळी इंजिनिअरच्या घरी चौघांचा मृतदेह सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 13:36 IST2025-02-17T13:31:21+5:302025-02-17T13:36:40+5:30

रविवारी चेतन कुटुंबासह त्यांच्या मूळ गावातील मंदिरात दर्शनासाठी गेला होता. त्यानंतर कुटुंबाने सासरी जात जेवण केले आणि त्यानंतर घरी परतले होते.

A family of four, a man, his mother, wife and son, were found dead in a Mysuru apartment | डिनरनंतर कुटुंब झोपी गेले अन् सकाळी इंजिनिअरच्या घरी चौघांचा मृतदेह सापडला

डिनरनंतर कुटुंब झोपी गेले अन् सकाळी इंजिनिअरच्या घरी चौघांचा मृतदेह सापडला

बंगळुरू - कर्नाटकच्या म्हैसूर इथं सोमवारी सकाळी २ वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृतदेह आढळला आहे. दक्षिण म्हेसूर येथे संकल्प सेरेन अपार्टमेंट्समध्ये जॉब कंसल्टेंसी फर्म चालणारे इंजिनिअर, त्यांची पत्नी, मुलगा आणि आई यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं समोर आले. प्राथमिक तपासात आर्थिक संकटात सापडलेल्या इंजिनिअरने आई, पत्नी आणि मुलाची हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. इंजिनिअरची आई अपार्टमेंटमधील दुसऱ्या फ्लॅटमध्ये राहत होती.

सोमवारी पोलिसांना संकल्प सेरेन अपार्टमेंटमध्ये एकाच कुटुंबातील ४ लोकांच्या मृत्यूची बातमी कळली. त्यानंतर तातडीने पोलीस आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले. या मृतांमध्ये चेतन, त्याची पत्नी रुपाली, १५ वर्षीय मुलगा कुशल आणि चेतनची आई प्रियंवदा यांचा समावेश आहे.चेतनचा मृतदेह त्याच्या फ्लॅटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला तर पत्नी आणि मुलाचा मृतदेह जमिनीवर पडला होता.  चेतनची आई प्रियंवदाचा मृतदेह त्याच कॉम्प्लेसमधील दुसऱ्या फ्लॅटमध्ये आढळला. चौघांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली. चेतनने मृत्यूपूर्वी व्हॉईस कॉल केला होता ज्यात आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होते.

दुबईत असलेला इंजिनिअर नुकताच कर्नाटकात आला

पोलिसांच्या माहितीनुसार, चेतन आणि त्याच्या कुटुंबाच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट नाही. आर्थिक तंगीमुळे हे पाऊल उचलल्याचा अंदाज आहे. चेतनवर खूप कर्ज होते. दुबईत इंजिनिअर म्हणून काम केल्यानंतर २०१९ साली तो म्हैसूरला परतला होता. तिथे त्याने जॉब कंसल्टेंसी सुरू केली. तो दुबईतील कंपन्यांमध्ये पदवीधरांना नोकरी देण्यासाठी मदत करायचा. रविवारी चेतन कुटुंबासह त्यांच्या मूळ गावातील मंदिरात दर्शनासाठी गेला होता. त्यानंतर कुटुंबाने सासरी जात जेवण केले आणि त्यानंतर घरी परतले होते.

दरम्यान, चेतनने पत्नी, मुलगा आणि आईला विष प्यायला दिले त्यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांनी सध्या सर्व मृतदेह पोस्टमोर्टमला पाठवले आहेत. फॉरेन्सिक आणि पोस्टमोर्टम रिपोर्टची प्रतिक्षा केली जात आहे. घटनेपूर्वी चेतनने त्याच्या मेव्हण्याला फोन केला होता जो अमेरिकेत राहतो. त्यानंतर ही बातमी पोलिसांकडे पोहचली. गेल्या एक दशकापासून चेतन आणि त्याचे कुटुंब अपार्टमेंटमध्ये राहत होते. त्यांचे कुटुंब लोकांमध्ये मिसळायचे परंतु त्यांच्या चेहऱ्यावर कुठलाही तणाव कधी दिसला नाही असं शेजाऱ्यांनी सांगितले.

Web Title: A family of four, a man, his mother, wife and son, were found dead in a Mysuru apartment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.