कर्जाच्या ओझ्याखाली घुसमटणाऱ्या कुटुंबानं घेतला टोकाचा निर्णय; ५ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 12:22 PM2022-11-10T12:22:24+5:302022-11-10T12:23:07+5:30

केदार लाल गुप्ता शहरातील विजय बाजारात फळांचे दुकान चालवतात. त्यांच्यावर खूप कर्ज होतं.

A family struggling under the burden of debt commit Suicide; 5 people died | कर्जाच्या ओझ्याखाली घुसमटणाऱ्या कुटुंबानं घेतला टोकाचा निर्णय; ५ जणांचा मृत्यू

कर्जाच्या ओझ्याखाली घुसमटणाऱ्या कुटुंबानं घेतला टोकाचा निर्णय; ५ जणांचा मृत्यू

googlenewsNext

नवादा - बिहारमध्ये कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एका कुटुंबाने मृत्यूला कवटाळलं आहे. नवादा परिसरातील न्यू एरिया येथील केदार लाल गुप्ता यांनी बुधवारी रात्री पत्नी आणि ४ मुलांसह विष पिऊन आत्महत्या केली आहे. कुटुंबातील ५ सदस्यांच्या आकस्मित मृत्यूनं परिसरात खळबळ माजली आहे. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. 

मृतांमध्ये घरातील प्रमुख केदार लाल गुप्ता, पत्नी अनिता कुमारी, ३ मुले प्रिन्स कुमार, शबनम कुमारी, गुडिया कुमारी यांचा समावेश आहे तर १ मुलगी साक्षी तिची अवस्था बिकट आहे. तिच्यावर नवादा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याठिकाणाहून तिला पटणा येथे नेण्यात आले आहे. केदार लाल गुप्ता शहरातील विजय बाजारात फळांचे दुकान चालवतात. त्यांच्यावर खूप कर्ज होतं. त्यामुळे कर्ज देणाऱ्यांनी त्यांच्यावर पैशांसाठी दबाव टाकला होता. वारंवार होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून केदार गुप्ता आणि कुटुंबाने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. 

घरातील सगळ्यांनीच विष पिऊन आत्महत्या केली. त्यात एका मुलीचा जीव सुदैवाने वाचला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. तेव्हा केदार गुप्ता हे जिवंत होते. पोलिसांनी त्यांना विचारले असता. ते म्हणाले की, माझ्या कुटुंबावर १०-१२ लाखांचे कर्ज आहे. या कर्जाच्या ओझ्याखाली आम्हाला जगणं कठीण झाले आहे. त्यामुळे सर्वांनी आनंदाने विष प्यायलं असं म्हटलं. केदार गुप्ता यांना रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. 

विष पिण्याआधी मुलानं बनवला व्हिडिओ
विष पिण्याआधी केदार गुप्ताचा मुलगा प्रिन्सनं एक व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओत त्याने सांगितले की, बाजारात काही लोकांकडून कर्ज घेतले होते. ते पैशासाठी आम्हाला सतवत आहेत. आम्ही पैसे परत देण्यासाठी थोडा वेळ मागितला परंतु ते ऐकण्यास तयार नव्हते. वारंवार धमकावत होते. ज्यामुळे सर्वांनी विष पिण्याचा निर्णय घेतला. तर या दुर्घटनेत वाचलेल्या साक्षीने म्हटलं की, कर्जामुळे वडिलांवर मानसिक तणाव आला होता. त्यामुळे आम्ही दडपणाखाली जीवन जगत होतो. त्यातून सुटका होण्यासाठी हा टोकाचा निर्णय घेतला. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: A family struggling under the burden of debt commit Suicide; 5 people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.