एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 09:20 AM2024-09-28T09:20:53+5:302024-09-28T09:24:36+5:30

Delhi Suicide Case : राजधानी दिल्लीत सामूहिक आत्महत्येच्या प्रकरणाने खळबळ माजली आहे. वसंत कुंज परिसरात भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या चार मुलीसह आत्महत्या केली. 

A father along with four daughters committed suicide by consuming poisonous substances in Delhi's Vasant Kunj area | एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

Delhi Suicide News : दिल्लीतील रंगपुरी परिसरात एका व्यक्तीने आपल्या चार मुलींसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ५० वर्षीय हिरालाल हे कुटुंबासोबत वसंत कुंज परिसरातील रंगपुरी भागात भाड्याच्या घरात राहत होते. चार मुलींसह आणि स्वतः विषारी पदार्थ खाऊन पाच जणांनी आत्महत्या केली. घरातून सडण्याचा वास येत असल्याने आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन दरवाजा तोडला तेव्हा हादरून गेले, कारण पाचही मृतदेह सडल्यामुळे दुर्गंधी येत होती. father and 4 daughters found dead in rented home in delhi)

पाच जणांची आत्महत्या, घटना नेमकी काय?

ही घटना दिल्लीतील रंगपुरी भागातील आहे. एका व्यक्तीने आपल्या चार मुलींनी विषारी पदार्थ खायला दिला. त्यानंतर स्वतःही खाल्ला. त्यामुळे पाच जणांचा मृत्यू झाला. शुक्रवारी (२७ सप्टेंबर) ही घटना समोर आली. पोलिसांनी ज्यावेळी घराचा दरवाजा तोंडून आत प्रवेश केला, ते दृश्य भयंकर होते. मृतदेह सडल्याने भयंकर दुर्गंधी येऊ लागली होती. 

मिळालेल्या माहितीनुसार, हिरालाल यांच्या चारही मुली अपंग होत्या. त्यांना चालता-फिरता येत नव्हते. हिरालाल यांच्या पत्नीचे आधीच निधन झालेले आहे. त्यामुळे मुलीची सगळी जबाबदारी हिरालाल यांच्यावर येऊन पडली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवले आणि प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 

आत्महत्येचे कारण काय?

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार हिरालालने मुली अपंग असल्याने आणि त्यांची सगळी जबाबदारी अंगावर पडल्याने हे पाऊल उचचले असावे. काम करणे आणि मुलींची जबाबदारी या दोन्ही गोष्टींचा ताण असह्य झाल्याने हिरालालने मुलींसह आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. 

नीतू (वय १८ वर्ष), निशी (वय १५ वर्ष), निरू वय (१० वर्ष ) आणि निधी (वय ८ वर्ष) अशी मयत मुलींची नावे आहेत. त्यांना अपंगत्वामुळे चालता फिरता येत नव्हते. 

घरात सडत होते पाच जणांचे मृतदेह

वसंत कुंज परिसरातील स्पायनल इंजरी हॉस्पिटलमध्ये कारपेंटर म्हणून हिरालाल काम करत होते आणि मुलीची काळजी घेत होते. पण, शुक्रवारी हिरालाल याच्या घरातून घाण वास येऊ लागला. त्यामुळे एका व्यक्तीने पोलिसांना याची माहिती दिली. 

पोलीस घटनास्थळी आल्यानंतर परिसरातील लोकांनी सांगितले की, हिरालाल आणि त्यांच्या कुटुंबातील कुणीही बऱ्याच दिवसापासून बाहेर दिसलेले नाही. त्यामुळे पोलिसांनी घरमालक आणि इतर काही जणांना घेऊन जाऊन दरवाजा तोडला. 

दरवाजा उघडताच वास वाढला. पोलिसांनी आत बघितले असता बेडवर हिरालालचा मृतदेह पडलेला होता. दुसऱ्या खोलीत चार मुलींचे मृतदेह बेडवर पडलेले होते. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सल्फास खाऊन पाच जणांनी आत्महत्या केली असावी, तसे पुरावे घटनास्थळावर मिळाले आहेत. 

Web Title: A father along with four daughters committed suicide by consuming poisonous substances in Delhi's Vasant Kunj area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.