मुलीच्या नाकाला चिमटा लावून क्रूर आई झोपी गेली; ५ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत

By नितिन गव्हाळे | Published: September 5, 2023 06:30 PM2023-09-05T18:30:51+5:302023-09-05T18:32:08+5:30

पतीची पत्नीविरुद्ध तक्रार, किशोरीला दोन दवाखान्यांसह सर्वोपचार रुग्णालयात आणले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी केल्यावर किशोरी मरण पावल्याचे सांगितले

A five-year-old child was killed by her mother; A case was filed after almost 2 months | मुलीच्या नाकाला चिमटा लावून क्रूर आई झोपी गेली; ५ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत

मुलीच्या नाकाला चिमटा लावून क्रूर आई झोपी गेली; ५ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत

googlenewsNext

अकोला: एका महिलेने आपल्या पाच वर्षांच्या फुलासारख्या निष्पाप मुलीच्या नाकाला कपड्यांचा चिमटा लावला. यात मुलीचा श्वास गुदमरल्याने, मुलीचा मृत्यू झाला. पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून आईच्या क्रूरतेचा खुलासा झाला. त्यानंतर, पतीच्या तक्रारीनुसार खदान पोलिसांनी तब्बल दोन महिन्यांनंतर सोमवारी गुन्हा दाखल केला असून, आईला मंगळवारी दुपारी अटक केली आहे.

बलोदे लेआउटमध्ये राहणारे रवी आमले (३६) यांच्या तक्रारीनुसार, त्यांना एक पाच वर्षीय किशोरी नामक मुलगी होती. त्यांची पत्नी विजया ही नेहमीच, त्यांच्यासह आईसोबत वाद करायची आणि कुटुंबापासून वेगळे राहण्यासाठी तगादा लावायची. त्यामुळे ते २०१९ पासून हिंगणा येथे भाड्याने राहायला आले. २ जून राेजी दुपारी ते १२ वाजताच्या सुमारास जेवायला घरी आले. त्यांची मुलगी किशोरी (५) ही ट्युशनवरून घरी आली. त्यांनी तिच्यासोबत जेवण घेतले आणि नंतर दोघांनीही दंगामस्ती केली. त्यानंतर रवी आमले हे कामासाठी बाहेर गेले.

दुपारी २.३० वाजताच्या सुमारास पत्नीचा त्यांना फोन आला व पत्नीने त्यांना किशोरी ही पलंगावर खेळता-खेळता झोपली, पण ती आता उठत नसल्याचे सांगून लवकर घरी येण्यास सांगितले. त्यामुळे रवी आमले यांनी त्यांच्या मित्राला फोन करून घरी जाण्यास सांगितले. ते घरी यायला निघाल्यावर पत्नी विजया व मित्र मुलगी किशोरी हिला दुचाकीवर दवाखान्यात नेत असताना दिसले. त्यानंतर किशोरीला दोन दवाखान्यांसह सर्वोपचार रुग्णालयात आणले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी केल्यावर किशोरी मरण पावल्याचे सांगितले. रवी आमले यांनी तक्रारीत, त्यांची पत्नी लग्नापासूनच वाद घालायची. घटस्फोटाची मागणी करायची. त्यांना हिणवायची. त्यामुळे पत्नीनेच मुलगी किशोरी हिच्या नाकाला प्लास्टीक चिमटा लावला. त्यामुळे किशोरी हिचा जीव गुदमरला आणि ती मरण पावल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात खदान पोलिसांनी मुलीच्या आईविरुद्ध भादंवि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा ठाणेदार धनंजय सायरे, पीएसआय निता दामधर, पोलिस कर्मचारी करंदीकर, आकाश राठोड करीत आहेत.

पत्नीने केला बनाव
किशोरी (५) ही खेळत असताना, तिने नाकाला चिमटा लावला आणि ती झोपी गेली. त्यानंतर, तिला उठविण्याचा प्रयत्न केला असता, ती झोपून उठत नसल्याचे रवी आमले यांना सांगितले होते, तसेच तिने चिमटा लावल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा बनाव करून, पत्नीने तिला मारून टाकल्याचे रवी आमले यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: A five-year-old child was killed by her mother; A case was filed after almost 2 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.