मूळव्याधाचा त्रास असलेल्या युवकाच्या शरीरात मित्राने एअर कंप्रेशरनं हवा भरली, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 08:07 PM2022-04-06T20:07:37+5:302022-04-06T20:07:53+5:30
प्राथमिक उपचारावेळी रुग्णाला पोटाशी संबंधित इंटेस्टाइनल ऑब्सत्क्षण नावाचा एक आजार आहे असं आढळलं.
अलीगड – उत्तर प्रदेशच्या अलीगड येथे किरकोळ कारणावरून नाराज मित्राने चक्क मित्राच्याच पाश्वभागात पाइप लावून एअर कंप्रेशरनं हवा भरली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. पीडित तरुणाची तब्येत बिघडताच नातेवाईकांनी त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु त्याठिकाणी डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर तरुणाची अवस्था पाहून सेंटर हॉस्पिटलला घेऊन जाण्याचा सल्ला दिला.
उत्तर प्रदेशातील अलीगडच्या शिवाला गावातील ही घटना आहे. याठिकाणी विजय धान कारखान्यातून मजुरी करणाऱ्यासोबत ही घटना घडली. त्याचा मित्र अनिल एचना गावचा रहिवासी असून दोघंही एकाच कारखान्यात काम करतात. अनिलने मित्र विजय शर्माच्या पाश्वभागात एअर कंप्रेशर पाइप लावून हवा भरली. ज्यामुळे विजयच्या पोटात प्रचंड हवा भरून ते टाइट झाले.
पीडित विजय शर्माचे शेजारी राजेश शर्मा यांनी सांगितले की, जेव्हा मी शेतात जात होतो तेव्हा विजयच्या मुलाचा मला फोन आला. फोनवर वडिलांची तब्येत खराब झाल्याचं त्याने सांगितले. त्यानंतर मी तातडीने विजयच्या घरी पोहचलो त्याठिकाणी विजय वेदनेने खूप व्याकुळ झाला होता. त्याता जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्यावेळी विजयनं अनिलने मागून हवा भरल्याचं सांगितले. त्यामुळे पोट खूप टाइट झाल्याचं पीडित विजय म्हणाला.
जिल्हा हॉस्पिटलचे डॉक्टर प्रवेश रंजन म्हणाले की, खैर ठाणे परिसरातून विजय शर्मा नावाचे रुग्ण आले होते. प्राथमिक उपचारावेळी रुग्णाला पोटाशी संबंधित इंटेस्टाइनल ऑब्सत्क्षण नावाचा एक आजार आहे असं आढळलं. ज्याची लक्षणे यामध्ये आढळून आली आहेत. पोट फुगले होते, त्याचा वैद्यकीय इतिहासही आहे. रुग्णाला आधीच मूळव्याधचा आजार असल्याचे सांगण्यात आले. पुढील उपचारासाठी आम्ही जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजला रेफर केले आहे. जिथे त्यांचे एक्स-रे आणि अल्ट्रासाऊंड केले जाईल. त्यानंतर परिस्थिती स्पष्ट होईल असं त्यांनी सांगितले.