चुगली लावल्याच्या वादातून मित्रांनीच केली मित्राची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 11:25 AM2023-05-27T11:25:57+5:302023-05-27T11:26:11+5:30

तिघांनाही दारूचे व्यसन होते. रात्रभर ते दारू पीत बसले होते. दारूवाल्याकडे चुगली करतो या कारणावरून पहाटे वाद झाला.

A friend killed a friend due to a dispute over a match | चुगली लावल्याच्या वादातून मित्रांनीच केली मित्राची हत्या

चुगली लावल्याच्या वादातून मित्रांनीच केली मित्राची हत्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : दारूवाल्याकडे चुगली लावल्याच्या कारणावरून झालेल्या वादात दोघा मित्रांनी अन्य एका मित्राला लाथाबुक्क्यांनी आणि दांडक्याने जिवे मारून त्याचा मृतदेह दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतून खाली फेकल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली.  पोलिसांनी दाेघांना एका दारूच्या गुत्त्यावरून अटक केली.

राजेश रामवृक्ष सहानी (वय ३८) असे मृत मित्राचे नाव आहे. याप्रकरणी दादू मटू जाधव ऊर्फ पाटील (वय ४५) आणि विनोद पडवळ या दोघांना दोन तासांतच अटक करण्यात मानपाडा पोलिसांना यश आले आहे. हा हत्येचा प्रकार पूर्वेतील सोनारपाडा गावदेवी मंदिराच्या समोरील साईश्रद्धा बिल्डिंगमध्ये घडला. तिघांनाही दारूचे व्यसन होते. रात्रभर ते दारू पीत बसले होते. दारूवाल्याकडे चुगली करतो या कारणावरून पहाटे वाद झाला. तो विकोपाला गेला आणि दादू आणि विनोदने राजेशला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत दांडक्याने प्रहार केले. यात राजेशचा जागीच मृत्यू झाला. 

खिडकीतून फेकले
 अपघात होऊन त्याचा मृत्यू झाला असे भासवण्यासाठी त्याला दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतून खाली फेकले तसेच घरात पडलेले रक्त कपड्याने पुसून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. 
 शुक्रवारी सकाळी नऊ वा. एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह बिल्डिंगच्या मागे पडला असल्याचे मानपाडा पोलिसांना कळवले.  
 प्राथमिक चौकशीत एका घरातून रात्री भांडणाचा आवाज येत होता, तसेच शेजारी राहणाऱ्याकडे दांडका मागण्यासाठी गेला होता.

Web Title: A friend killed a friend due to a dispute over a match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.