उसनवारीच्या ६० रुपयांसाठी केला मित्राचा गळा आवळून खून 

By नरेश रहिले | Published: October 9, 2023 02:42 PM2023-10-09T14:42:46+5:302023-10-09T14:42:55+5:30

दवनीवाडा पोलिसांनी केली आरोपीला अटक : दिलेले पैसे परत मिळणार नसल्याचा विश्वास असल्याने केला खून

A friend was strangled to death for Usanwari's 60 rupees | उसनवारीच्या ६० रुपयांसाठी केला मित्राचा गळा आवळून खून 

उसनवारीच्या ६० रुपयांसाठी केला मित्राचा गळा आवळून खून 

googlenewsNext

गोंदिया : क्षुल्लक कारणावरून दिवसेंदिवस हाणामारीच्या घटना घडत असल्याचे आणि त्यातून गंभीर खुनासारखे प्रकारसुद्धा घडू लागले आहेत. अशीच एक घटना दवनीवाडा पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बोदा येथे ८ ऑक्टोबर रोजी दुपारी बोदा येथे घडली आहे. उसनवारीवर दिलेल्या फक्त ६० रुपयांसाठी मित्रानेच मित्राचा गळा आवळून खून केला. आकाश लक्ष्मण दानवे (वय २०, रा. बोदा) असे मृतकाचे नाव आहे.

आरोपी अल्पेश कुवरलाल पटले (रा. हुडकाटोला, बोदा, ता. तिरोडा, जि. गोंदिया) याने आपला मित्र आकाश लक्ष्मण दानवे (२०, रा. बोदा) याला उसनवारीवर दिलेले ६० रुपये परत देण्याची मागणी केली. यावर मृतकाने पैसे सायंकाळी फोन- पेने पाठवतो असे सांगितले. त्यावर आरोपी अल्पेश पटले याचा त्याच्यावर विश्वास बसला नाही, त्यामुळे त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यात आरोपी अल्पेश पटले याने आकाश लक्ष्मण दानवे याचा गळा आवळून तुला ठार करतो, असे म्हणत त्याला जमिनीवर पाडले.

छातीवर डाव्या हाताने जोराने बुक्का मारला. त्यात आकाश हा बेशुद्ध झाला. लगेचच आकाशला प्राथमिक आरोग्य केंद्र दवनीवाडा येथे हलविण्यात आले. तिथून पुढील उपचारासाठी तिरोडाच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले. विजेश पतिराम दानवे (रा. बोदा) यांच्या तक्रारीवरून दवनीवाडा पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणेदार सतीश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दवनीवाडा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून आरोपी अल्पेश कुंवरलाल पटले (२१, रा. हुडकाटोला, बोदा) याला अटक केली आहे. तपास पोलिस निरीक्षक सतीश जाधव करीत आहेत.

Web Title: A friend was strangled to death for Usanwari's 60 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.