मोबाईल टॉवरमधील कार्ड चोरणारी टोळी गजाआड, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 05:13 PM2024-10-04T17:13:59+5:302024-10-04T17:14:17+5:30

या टोळीकडून ४० लाख रुपये किंमतीच्या ३६ मशिन्स हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून २० गुन्ह्यांची उकल केल्याची माहिती पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी शुक्रवारी दिली आहे.

A gang stealing cards from a mobile tower goes underground, seizes valuables worth lakhs | मोबाईल टॉवरमधील कार्ड चोरणारी टोळी गजाआड, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

मोबाईल टॉवरमधील कार्ड चोरणारी टोळी गजाआड, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

- मंगेश कराळे

नालासोपारा : मोबाईल टॉवरमधून रेडिओ फ्रिक्वेन्सीसाठी लावण्यात येणारे मशीन (आझना कार्ड) चोरी करून आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री करणाऱ्या ७ आरोपींच्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीकडून ४० लाख रुपये किंमतीच्या ३६ मशिन्स हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून २० गुन्ह्यांची उकल केल्याची माहिती पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी शुक्रवारी दिली आहे.

आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ ऑगस्टला फेन ऍव्हेन्यू अपार्टमेंटमध्ये लावलेल्या एअरटेल मोबाईल टॉवरमधून चोरट्यांनी रेडिओ फ्रिक्वेन्सीसाठी लावण्यात येणारे मशीन (आझना कार्ड) चोरून नेले होते. आचोळे पोलिसांनी याप्रकरणी १४ सप्टेंबरला गुन्हा दाखल केला होता. पोलीस आयुक्तालयात गेल्या काही महिन्यांपासून मोबाईल टॉवरवरील नेटवर्कसाठी बसविण्यात आलेले रेडीओ फ्रिक्वेनरी मशिन (आझना कार्ड) चोरीच्या गुन्हयात वाढ झाली होती. या घटनांची वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेत वरिष्ठांच्या आदेशाने या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट तीनकडे वर्ग करण्यात आला.

गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने घटनास्थळाचे तांत्रिक विश्लेषण करून तसेच मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी शुभम यादव (२४), शैलेश यादव (२५), कपुरचंद्र गुप्ता (२५), बंन्सीलाल जैन (५०), जाकीर मल्लिक (२५), जैद मलिक (१९) आणि मोहम्मद जुनैद  मलिक (२४) यांना ताब्यात घेतले आहे. काही आरोपींना दिल्ली, उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेतले आहे. या आरोपीकडून आतापर्यंत ४० लाख रुपये किंमतीचे ३६ मशिन कार्ड, मोबाईल फोन, गुन्हा करताना वापरलेली दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

अटक आरोपी सदर चोरीचे मशिन हे हाँगकाँग व चीन येथे बेकायदेशीररित्या विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अटक आरोपीकडून बिहार, झारखंड, पश्चिम बगाल, पंजाब, गोवा या राज्यातून चोरी केलेले आझना कार्ड हस्तगत केले आहेत. अटक आरोपी यांनी मागील एक वर्षापासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार, नालासोपारा परिसरात मोठ्या प्रमाणात आझना कार्डची चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी हे सद्य स्थितीत पोलीस कोठडीमध्ये आहेत.

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, सपोनि सोपान पाटील, पोउपनिरी उमेश भागवत, सफौ. अशोक पाटील, पोहवा मनोज चव्हाण, सचिन घेरे, मुकेश तटकरे, सागर बारवकर, अश्विन पाटील, राकेश पवार, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, मनोज तारडे, तुषार दळवी, आतिश पवार, मसुब प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे तसेच सायबर सेलचे संतोष चव्हाण यांनी पार पाडली आहे.

Web Title: A gang stealing cards from a mobile tower goes underground, seizes valuables worth lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.