बॉयफ्रेंडसोबत राहण्यासाठी 'तिने' स्वत:सारख्याच दिसणाऱ्या दुसऱ्या मुलीला संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 08:10 AM2023-03-18T08:10:45+5:302023-03-18T08:11:12+5:30

कुटुंबातील व्यक्तींसोबत पोलीस घटनास्थळी पोहचले त्याठिकाणी मृतदेह पाहून ती शहरबानच असल्याची पुष्टी कुटुंबाने केली.

A German woman is accused of murdering a lookalike she found | बॉयफ्रेंडसोबत राहण्यासाठी 'तिने' स्वत:सारख्याच दिसणाऱ्या दुसऱ्या मुलीला संपवलं

बॉयफ्रेंडसोबत राहण्यासाठी 'तिने' स्वत:सारख्याच दिसणाऱ्या दुसऱ्या मुलीला संपवलं

googlenewsNext

बॉयफ्रेंडसोबत राहण्यासाठी एका मुलीने तिच्यासारख्या दिसणाऱ्या दुसऱ्या मुलीचा निर्दयी खून केल्याची खळबळजनक घटना २०२२ मध्ये घडली होती. या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू होता. त्यात आता बॉयफ्रेंड आणि त्याच्या गर्लफ्रेंडला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बॉयफ्रेंडच्या जबाबावरून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. त्या दोन्ही आरोपींना कोर्टासमोर हजर केले. त्यानंतर कोर्टाने दोघांची रवानगी जेलमध्ये केली आहे. सध्या या खटल्यावर कोर्टात सुनावणी सुरू आहे. 

१६ ऑगस्ट २०२२ रोजी जर्मनीच्या म्युनिक शहरात रस्त्याकिनारी उभ्या मर्सिडिज कारमध्ये मागील सीटवर रक्ताच्या थारोळ्यात एका मुलीचा मृतदेह सापडला. जिच्या चेहऱ्यावर एक दोन नव्हे तर तब्बल ५० वेळा चाकूने वार केल्याचं दिसून आले. इतका निर्दयी खून पाहून पोलीसदेखील हैराण झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत चौकशी सुरू केली. कारच्या नंबर प्लेटवरून मालकाचा शोध घेतला. तर ही कार २३ वर्षीय शहरबान के नावाच्या मुलीची असल्याचं समोर आले. पोलिसांनी तिच्या घरी जात चौकशी केली तेव्हा १५ ऑगस्ट २०२२ पासून ती घरी परतलीच नाही असं घरच्यांनी सांगितले. 

कुटुंबातील व्यक्तींसोबत पोलीस घटनास्थळी पोहचले त्याठिकाणी मृतदेह पाहून ती शहरबानच असल्याची पुष्टी कुटुंबाने केली. मुलीचा चेहरा ओळखताही येत नव्हता. परंतु तिच्या केसाचा रंग, उंची आणि शारिरीक फिटनेस शहरबानसारखाच होता. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला. मुलीची ओळख पटावी यासाठी पोलिसांनी मृतदेहाची डीएनए चाचणीही केली. मात्र शहरबानचा मृत्यू झाल्याचं समजून कुटुंबात शोककळा पसरली. तर दुसरीकडे DNA चाचणीच्या रिपोर्टने घटनेत मोठा ट्विस्ट आला. कारण हा मृतदेह शहरबानचा नव्हता तर दुसऱ्या मुलीचा होता. ही मुलगी कोण आणि शहरबान कुठे आहे? याचं उत्तर शोधणं पोलिसांसमोर आव्हानात्मक होते. 

सोशल मीडियावरून गूढ उकललं
पोलिसांनी तपासाला सुरुवात केली, आसपासच्या पोलीस ठाण्यात बेपत्ता होण्याची कुणी तक्रार केलीय का त्याचा शोध घेतला. त्याचवेळी पोलिसांनी शहरबानचं सोशल मीडिया अकाऊंट तपासले. त्यात शहरबानचा एक बॉयफ्रेंड असल्याचं पुढे आले. बॉयफ्रेंडसोबत शहरबान सातत्याने संपर्कात होती. जेव्हा पोलिसांनी शहरबानच्या फ्रेंडलिस्टची बारकाईने पडताळणी केली तेव्हा तिच्यासारखीच दिसणारी दुसऱ्या मुलीचं प्रोफाईल दिसले. 

पोलिसांनी आयडी पाहून या मुलीचा शोध घेतला. तिचे नाव होते खदीजा ओ(Khadidja O)जी ब्यूटी ब्लॉगर होती. ती शहरबानच्या घरापासून १०० किमी अंतरावर राहायची. खदीजाचा शोध पोलिसांनी घेतला. तेव्हा ती २ दिवसांपासून गायब आहे ते कळालं. त्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. सापडलेल्या मुलीच्या मृतदेहाचा डिएनए आणि खदीजा कुटुंबातील व्यक्तीचा डिएनए तपासला तेव्हा हा मृतदेह खदीजाचा असल्याचं समोर आले. त्यानंतर पोलिसांनी शहरबानचा शोध सुरू केला. तेव्हा सुरुवातीला शहरबानचा बॉयफ्रेंड शेकीर पोलिसांच्या हाती लागला. त्याच्या माध्यमातून फेब्रुवारी २०२३ रोजी शहरबानचा शोध लागला आणि तिला ताब्यात घेण्यात आले. 

शहरबाननं संपूर्ण घटनाच सांगितली
पोलिसांनी या घटनेबाबत शहरबानची कसून चौकशी केली तेव्हा तिने धक्कादायक खुलासा केला. New York Post नुसार, शहरबाननेच खदीजाची हत्या केली. शहरबान चौकशीत म्हणाली की, मी घरच्यांना वैतागली होती. मी बॉयफ्रेंड शेकीरवर खूप प्रेम करायची. पण जेव्हा ही गोष्ट घरच्यांना कळाली तेव्हा त्यांनी विरोध केला. शेकीरपासून लांब राहा असं त्यांनी बजावलं. परंतु मला शेकीरपासून दूर राहायचं नव्हते. त्यासाठी शेकिरसोबत राहण्यासाठी मी सीक्रेट आयुष्य जगण्यासाठी मी प्लॅन आखला. 

शेकिरला मी सांगितले, मी जगासमोर मृत असलेली दाखवते. मग घरचे मला तुझ्यापासून दूर करू शकणार नाहीत. मग शेकिर आणि मी प्लॅन आखत माझ्यासारख्याच दिसणाऱ्या एका मुलीचा शोध घेतला. त्यानंतर तिची हत्या करून चेहरा ओळखता येणार नाही अशी अवस्था केली. त्यात सर्वांना वाटेल शहरबान आता या जगात नाही असं या दोघांनी मिळून ठरवले. शहरबानने पहिले खदिजाशी मैत्री केली. त्यानंतर तिला भेटण्यासाठी बोलावले. खदीजा तिला भेटायला गेली तेव्हा तिच्यासोबत काय घडणार याची कल्पनाही तिला नव्हती. शहरबान आणि शेकिरने बहाण्याने तिला कारमध्ये बसवून निर्जनस्थळी घेऊन गेले. तिथे गळा दाबून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर चाकूने चेहऱ्यावर वार करून तिची ओळख पटणार नाही असं कृत्य केले. मात्र पोलिसांनी या सर्व प्रकाराचा शोध घेत शहरबान आणि शेकिर या दोघांना अटक केली. 

Web Title: A German woman is accused of murdering a lookalike she found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.