पार्टीवरून परतणाऱ्या मुलीवर उबर चालकाने केला बलात्कार, खून करून मृतदेह दिला फेकून

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 05:04 PM2022-08-05T17:04:40+5:302022-08-05T17:16:51+5:30

Rape Case : डिसेंबर 2017 ची ही घटना बेरूतमध्ये घडली. याप्रकरणी चौकशी समितीने नवे तथ्य उघड केले आहे.

A girl returning from a party was raped by an Uber driver, killed and dumped | पार्टीवरून परतणाऱ्या मुलीवर उबर चालकाने केला बलात्कार, खून करून मृतदेह दिला फेकून

पार्टीवरून परतणाऱ्या मुलीवर उबर चालकाने केला बलात्कार, खून करून मृतदेह दिला फेकून

googlenewsNext

एका 30 वर्षीय मुलीने मुलींच्या नाईटआउटवरून परतत असताना उबेर कॅब बुक केली. वाटेत उबर कॅब चालकाने मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर तिचा गळा दाबून खून करण्यात आला. यानंतर मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून त्याने पळ काढला. डिसेंबर 2017 ची ही घटना बेरूतमध्ये घडली. याप्रकरणी चौकशी समितीने नवे तथ्य उघड केले आहे.

या प्रकरणात यापूर्वीच दोषी ठरलेल्या चालकाला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. पण त्याला फाशी होऊ शकली नाही. आता चालक आपली शिक्षा कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. रेबेका डायक्सने बेरूतमधील ब्रिटिश दूतावासात काम केले. कॅब ड्रायव्हर तारिक होशिहोने बलात्कारानंतर तिची हत्या केली होती. तारिकने त्याच्या हुडीच्या स्ट्रिंगने रेबेकाचा गळा दाबला.

या प्रकरणी 2019 मध्ये चालकाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. रेबेकाच्या मृत्यूची दीर्घकाळ चाललेली चौकशी या आठवड्यात लंडनमध्ये पुन्हा उघडण्यात आली. यानंतर हे खून प्रकरण पुन्हा चर्चेत आले.

लंडन न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान ब्रिटनची रहिवासी असलेली रेबेका लेबनॉनमधील बेरूत येथील ब्रिटिश दूतावासात काम करत असल्याचे सांगण्यात आले. ती निर्वासितांना मदत करण्याचे काम पाहत होती. ख्रिसमससाठी ती ब्रिटनला परतणार होती, पण त्याआधीच बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आली. 16 डिसेंबर 2017 रोजी तिचा मृतदेह रस्त्याच्या कडेला सापडला होता. रेबेकाच्या हत्येप्रकरणी तारिक नावाच्या कॅब चालकाला सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने अटक करण्यात आली होती.
 

दोषीचा गुन्हेगारी रेकॉर्ड होता
एजन्सीच्या अहवालानुसार, तारिकचा जुना गुन्हेगारी रेकॉर्ड होता. छळ आणि चोरीच्या आरोपाखाली त्याला यापूर्वी दोनदा अटक करण्यात आली होती. असे असूनही तो उबर कॅब चालक म्हणून काम करत होता.
 
दूतावासाने वापरावयाच्या वाहनांमध्ये उबर कॅबचा समावेश नव्हता, असेही अहवालात म्हटले आहे. मात्र, रेबेकाच्या मृत्यूनंतर दूतावासातील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. त्याचवेळी रेबेकाच्या हत्येला 5 वर्षे उलटून गेल्यानंतरही तिच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. कोर्टात रेबेकाच्या आईने सांगितले की, हे आमच्यावर आलेले दुःख कुणावरही जाऊ नये, आता फक्त असंच वाटतं आहे. त्या दिवशी रेबेकाने सेफ्टी अलार्म लावला असता तर ती वाचू शकली असती असे पुढे आई म्हणते.

 

Web Title: A girl returning from a party was raped by an Uber driver, killed and dumped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.