निर्घृण खूनाने पुणे शहर हादरले, लाईन बॉय विजय ढुमेचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 10:30 PM2023-09-29T22:30:35+5:302023-09-29T22:31:32+5:30

विजय ढूमे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.. विजय हा लाईन बॉय होता..

A gruesome murder shook the city of Pune, the murder of line boy Vijay Dhume | निर्घृण खूनाने पुणे शहर हादरले, लाईन बॉय विजय ढुमेचा खून

निर्घृण खूनाने पुणे शहर हादरले, लाईन बॉय विजय ढुमेचा खून

googlenewsNext

- किरण शिंदे

पुणे : पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत संपन्न झाल्यानंतर पुणे पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. मात्र विसर्जन मिरवणुका संपन्न होतात तोवरच पुन्हा एकदा पुणे शहर निर्घृण खुनाने हादरले आहे.. शहरातील सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका तरुणाचा अतिशय निर्घृणरित्या खूण करण्यात आला.. बांधकामाच्या लोखंडी सळई आणि भरीव लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण करून हा खून करण्यात आलाय.. शुक्रवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली...

विजय ढूमे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.. विजय हा लाईन बॉय होता.. तो सेवानिवृत्त पोलिसाचा मुलगा होता.. शहरातील राजकीय व्यक्तीसोबत त्याची उठवत होते.. इतकच नाही तर अनेक बड्या पोलीस अधिकाऱ्यांशी त्याचे मैत्रीचे संबंध होते.. आज सायंकाळच्या सुमारास तो सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील क्वालिटी लॉज मध्ये गेला होता.. लॉज मधून बाहेर पडत असताना चार ते पाच हल्लेखोरांनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला.. बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी सळ्या आणि लाकडी दांडक्याने त्याच्या डोक्यात मारहाण केली.. या संपूर्ण घटनेत गंभीर जखमी झालेल्या विजयचा जागीच मृत्यू झाला..

दरम्यान खून झाल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले.. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे.. यातील एका सीसीटीव्ही कॅमेरा विजय जाताना दिसतोय.. त्यानंतर चार ते पाच मारेकरी ही या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.. मात्र पोलीस दलातील अधिकाऱ्यांशी आणि शहरातील राजकारण्यांची घनिष्ठ मैत्री असणाऱ्या एका व्यक्तीचा अशा प्रकारे निर्घृणपणे खून झाल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे..

Web Title: A gruesome murder shook the city of Pune, the murder of line boy Vijay Dhume

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.