चिखलीत दराेडेखाेरांचा हैदाेस; पती,पत्नीस केली मारहाण

By संदीप वानखेडे | Updated: February 3, 2024 12:52 IST2024-02-03T12:51:12+5:302024-02-03T12:52:07+5:30

या मारहाणीत दाेघेही पती, पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. अलका नवले यांच्या डाेक्याला ३५ टाके पडले आहेत.

A husband and wife have been seriously injured in a beating by Daredekhars in Buldhana. | चिखलीत दराेडेखाेरांचा हैदाेस; पती,पत्नीस केली मारहाण

चिखलीत दराेडेखाेरांचा हैदाेस; पती,पत्नीस केली मारहाण

चिखली : शहरातील गजानन नगर परिसरात एका घरात सहा दराेडेखाेरांनी ३ फेब्रुवारीच्या पहाटे हैदाेस घातला. दराेडेखाेरांनी केलेल्या मारहाणीत पती व पत्नी गंभीर जखमी झाले आहे.

चिखली शहरातील गजानन नगर परिसरात गजानन नवले यांच्या घरात शनिवारी पहाटे ३ वाजता सहा दराेडेखारांनी मागील दरवाजा ताेडून घरात प्रवेश केला. त्यांनी नवले व त्यांच्या पत्नीला झाेपेतून उठवून पैसे आणि साेने कुठे ठेवले आहे, याची विचारणा केली. यावेळी त्यांनी दाेघांवरही लांखेंडी राॅडने हल्ला केला. अलका नवले यांनी यावेळी आरडाओरड केल्याने समाेरच्या खाेलीत झाेपलेले पप्पू नवले हे धावत गेल्याने दराेडेखाेरांनी चारचाकी वाहनातून पळ काढला.

या मारहाणीत दाेघेही पती, पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. अलका नवले यांच्या डाेक्याला ३५ टाके पडले आहेत. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी दराेडेखाेरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच चिखली पाेलिसांनी घटनास्थळावर धाव घेवून पंचनामा केला. तसेच पुढील तपास पाेलीस करीत आहे. या घटनेमुळे चिखली शहरात खळबळ उडाली आहे.

Web Title: A husband and wife have been seriously injured in a beating by Daredekhars in Buldhana.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.