तिहेरी हत्याकांडाने खळबळ! पतीनं पत्नी, प्रियकरासह ६ महिन्याच्या बाळालाही संपवले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 03:52 PM2023-06-15T15:52:30+5:302023-06-15T15:52:52+5:30
पत्नी तिच्या प्रियकरासह लहान मुलीला घेऊन पतीच्या घरी आली होती. ती बळजबरीने घरात घुसण्याचा प्रयत्न करत होती
कन्नौज - उत्तर प्रदेशच्या कन्नौज इथं हृदयद्रावक घटना घडली आहे. याठिकाणी एका पतीने पत्नी, तिचा प्रियकर आणि लहान मुलीची क्रूर हत्या केली आहे. ट्रिपल मर्डरची ही घटना समोर येताच परिसरात खळबळ माजली. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याने पतीने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. रात्री उशीरा प्रियकरासह पत्नी पतीला भेटण्यासाठी आली होती तेव्हा ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी तिच्या प्रियकरासह लहान मुलीला घेऊन पतीच्या घरी आली होती. ती बळजबरीने घरात घुसण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे पतीचा राग अनावर झाला. या रागात पतीने पत्नी, तिचा प्रियकर आणि लहान मुलालाही संपवले. मनोज जाटव नावाच्या व्यक्तीने हे तिहेरी हत्याकांड घडवल्याचा आरोप आहे. रात्री १२ च्या सुमारास पतीने हे कृत्य केले.
लहान मुलगी त्याची नाही असा पतीला संशय होता. त्याच संशयातून पतीने लहान मुलालाही सोडले नाही. हत्याच्या आरोपाखाली पोलिसांनी पतीला अटक केली असून सध्या तपास सुरू आहे. घटनेनंतर तात्काळ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी तिन्ही मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवत घटनास्थळाचा पंचनामा केला.
काय आहे प्रकरण?
उधमपूर गावात राहणाऱ्या मनोजची पत्नी पिंकी २ वर्षापूर्वी प्रियकर सतेंद्रसोबत पळून गेली होती. त्या काळात तिने एका मुलीला जन्म दिला. बुधवारी पत्नी प्रियकर आणि सहा महिन्याच्या मुलीसह पतीच्या घरी पोहचली. रात्रीच्या १२ वाजता ती बळजबरीने पतीच्या घराच घुसण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी पती मनोज आणि तिच्यात वाद झाला. त्यानंतर संतापलेल्या पतीने लाठी-काठीने मारहाण करत तिघांचीही हत्या केली.
आरोपीने पोलिसांना सांगितले की, ज्या महिलेची मी हत्या केली ती माझी पत्नी होती. २ वर्षापूर्वी तिने माझ्या दोन्ही मुलांना आणि मला सोडून प्रियकरासोबत पळून गेली. प्रियकराशी संबंध ठेवत तिला एक मुलगी झाली. बुधवारी अचानक ही महिला माझ्या घरी आली आणि बळजबरीने ते माझ्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत होते असं त्याने सांगितले.