इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 06:51 PM2024-09-22T18:51:40+5:302024-09-22T19:16:31+5:30

इस्रायलच्या औषधाचा मराठी सिनेमातील गंमतीचा किस्सा पुन्हा चर्चेत आलेला आहे. अशोक सराफने मधुमेहावरील औषध आणण्यासाठी सत्तर रुपये घरमालकाकडून उकळले होते. तो किस्सा खराच होता असा खुलासा नुकताच झालेला आहे.

A machine that makes a 65-year-old man 25 after Israel's oil; Thug couple robbed 500 people | इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले

इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले

इस्रायलच्या औषधाचा मराठी सिनेमातील गंमतीचा किस्सा पुन्हा चर्चेत आलेला असताना कानपूरमध्ये ६०-६५ वर्षांच्या व्यक्तीलाही २५ वर्षांच्या तरुणासारखी शक्ती येण्याचे सांगत शेकडो लोकांना ३५ कोटी रुपयांना चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या व्यक्तीने त्याच्या पार्टनरलाही लाखोंचा चुना लावला आहे. 

वय घटविण्याचे इस्रायली तंत्रज्ञान असल्याचे सांगत या व्यक्तीने पॉश भागात ऑफिस थाटले होते. साकेत नगरमध्ये रेनू सिंह चंदेल यांनी एका दाम्पत्यासोबत पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरु केला होता. या दाम्पत्याने ५०० हून अधिक लोकांना ठकविले असल्याचा आरोप चंदेल यांनी केले आहे. 

राजीव कुमार दुबे व त्याची पत्नी रश्मी यांनी रिव्हायवल वर्ल्ड नावाने ऑफिस थाटले होते. इस्रायलच्या शास्त्रज्ञांनी शोधलेल्या तंत्रज्ञानाने ऑक्सिजन थेरपीद्वारे ६४ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे बनविण्याची जाहिरात त्यांनी केली होती. ही मशीनच २५ कोटींची असल्याचे त्यांनी लोकांना सांगितले होते. २५ वर्षांचे बनविण्यासाठी सहा हजारात १० वेळा आणि ९० हजारात दोन महिने ट्रिटमेंट देण्याचे आमिष दाखविले. याला शेकडो लोक भुलले होते. 

तक्रारदार चंदेल यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार दुबेने त्यांचे १०.७५ लाख रुपये आणि लोकांचे सुमारे ३५ कोटी रुपये लाटले आहेत. हे दोघे परदेशात फरार होण्याची शक्यता आहे. या दोघांनी मशीनद्वारे ट्रिटमेंट देण्यासाठी डॉक्टर, नर्स नोकरीला ठेवण्याचे सांगत चंदेल यांच्याकडून पैसे घेतले होते. 
 

Web Title: A machine that makes a 65-year-old man 25 after Israel's oil; Thug couple robbed 500 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.