धक्कादायक! भांडण झाल्याचा राग अनावर, कुटुंबातील तिघांवर चढवली कार, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 12:11 PM2023-02-02T12:11:54+5:302023-02-02T13:04:44+5:30

देवेंदर (२७) असे आरोपीचे नाव असून तो मनौली गावचा रहिवासी आहे. घटनेपासून आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

a man runs over three members of his own family with car in punjab mohali | धक्कादायक! भांडण झाल्याचा राग अनावर, कुटुंबातील तिघांवर चढवली कार, एकाचा मृत्यू

धक्कादायक! भांडण झाल्याचा राग अनावर, कुटुंबातील तिघांवर चढवली कार, एकाचा मृत्यू

googlenewsNext

मोहाली : पंजाबमधील मोहाली (Mohali) येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोहालीच्या मनौली गावात एका तरुणाने रागाच्या भरात आपल्याच कुटुंबातील तीन जणांवर कार चालवली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेत आरोपीचा चुलत भाऊ रणजित सिंग (४०) याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. देवेंदर (२७) असे आरोपीचे नाव असून तो मनौली गावचा रहिवासी आहे. या घटनेनंतर आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

याप्रकरणी बलजीत सिंग यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, ते एकत्र कुटुंबासोबत राहतात. त्यांच्या काकाचा मुलगा देवेंद्र याचे घरात भांडण झाले होते. त्यामुळे तो रागावला आणि त्याची रेंज रोव्हर गाडी घेऊन घराबाहेर पडू लागला. हे पाहून त्याचा भाऊ रणजित सिंग, काका जर्नेल सिंग, देवेंदरची आई मनजीत कौर (काकू) त्याला रोखण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर त्यांना घाबरवण्यासाठी त्याने वेगाने कार त्यांच्या दिशेने वळवली.

बलजीतच्या म्हणण्यानुसार, कारच्या धडकेने ते सर्वजण जमिनीवर पडले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. तिघांनाही मोहालीच्या फेज-8 येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी रणजित सिंगला मृत घोषित केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळेपासून आरोपी फरार असून, आरोपीची आईही या घटनेत गंभीर जखमी आहे. सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्याचवेळी काका जर्नेल सिंग यांची प्रकृती ठीक आहे. रुग्णालयातून उपचारानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

Web Title: a man runs over three members of his own family with car in punjab mohali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.