मुलीला पळवित असल्याच्या संशयावरुन कल्याणमध्ये एकाला बेदम चोप

By मुरलीधर भवार | Published: September 30, 2023 02:26 PM2023-09-30T14:26:07+5:302023-09-30T14:26:17+5:30

कल्याण पश्चिमेतील बैल बाजार येथील जुने आरटीओ कार्यालया जवळ एका हॉटेलमध्ये एक पाच वर्षाची मुलगी तिच्या वडिलांसोबत आली होती.

A man was hacked to death in Kalyan on suspicion of abducting a girl | मुलीला पळवित असल्याच्या संशयावरुन कल्याणमध्ये एकाला बेदम चोप

मुलीला पळवित असल्याच्या संशयावरुन कल्याणमध्ये एकाला बेदम चोप

googlenewsNext

कल्याण -लहान मुलीस पळवून नेत असल्याच्या संशयावरुन एका व्यक्तीला चोप देत नागरीकांनी त्याला पोलिसांच्या दिले आहे. ही घटना काल घडली आहे. मात्र पोलिस चौकशीत असा काही प्रकार त्या व्यक्तीने केला नसल्याचे समोर आले आहे. ही घटना गैर समजूतीतून घडली असून त्या व्यक्तीला नाहक मार खावा लागला. या घटनेमुळे एकच गोंधळ निर्माण झाला होता.

कल्याण पश्चिमेतील बैल बाजार येथील जुने आरटीओ कार्यालया जवळ एका हॉटेलमध्ये एक पाच वर्षाची मुलगी तिच्या वडिलांसोबत आली होती. हॉटेलच्या बाहेर एक व्यक्ती उभा होता. या व्यक्तीने त्या मुलीला काही तरी देऊन पळवून नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा संशय त्याठिकाणी असलेल्या नागरीकांना आला. नागरीकां त्या व्यक्तिची विचारपूस केली. त्याला मराठी हिंदी येत नसल्याने तो दाक्षिणात्य भाषेत बोलत होता. नागरीकांना त्याचा संशय आला. नागरीकांनी त्याला चोप दिला. या दरम्यान बाजारपेठ पोलिसांना याची माहिती देण्यात आली. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी किरण वाघ त्याठिकाणी पोहचले. त्या व्यक्तिला पोलिस गाडीमध्ये टाकण्यात आले.

पोलिस गाडी भोवती नागरीकांची गर्दी जमली होती. ही घटना ज्या ठिकाणी घडली तो परिसर महात्मा फुले पाेलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने त्या व्यक्तिला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने यांनी सांगितले की, लक्ष्मण नायक असे त्या व्यक्तिचे नाव आहे. तो टिटवाळ्यात त्याच्या कुटुंबासोबत राहतो. त्याला दारुचे व्यवसन आहे. रात्री तो हॉटेल बाहेर बरेस वेळ थांबला होता. हॉटेलच्या एका कामगाराने गैरसमजूतीतून काही लोकांना त्याच्या बद्दल माहिती दिली. मात्र आम्ही मुलगी आणि तिच्या वडिलांची विचारपूस केली असता लक्ष्मण नायक यांनी त्या मुलीला पळवून नेण्याच्या इराद्याने काही केले असावे असे काही आढळून आले नाही. तरी देखील आमची चौकशी सुरु आहे.

गैरसमजूतीतून नागरीकांनी त्या व्यक्तिला मारहाण केली. याच मारहाणी दरम्यान काही अनूचित प्रकार त्याच्यासोबत घडला असता. ते त्यांच्या जीवावर बेतू शकले असते. नागरीकांनी संशय घेऊन त्या व्यक्तिला मारण्या आधी पोलिसांना पाचारण केले पाहिजे.

Web Title: A man was hacked to death in Kalyan on suspicion of abducting a girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.