अनैतिक प्रेमसंबधातून विवाहित महिलेने प्रियकरासह विहिरीत घेतली उडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 19:06 IST2022-03-16T19:05:06+5:302022-03-16T19:06:16+5:30
Extra Marital Affair : वर्ध्यातील घटनेने खळबळ, परिसरात उलटसुलट चर्चेला उधान

अनैतिक प्रेमसंबधातून विवाहित महिलेने प्रियकरासह विहिरीत घेतली उडी
वर्धा : प्रेमसंबंधातून विवाहितेने तिच्या प्रियकरासह विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. ही घटना वर्ध्यातील जुना म्हसाळा परिसरात १६ रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. मंगला राजेंद्र उमाटे (४०) रा. जुनी वस्ती म्हसाळा, महेश कमलाकर बारई (४०) रा. तळेगाव टा. ह.मु. वरुड अशी मृतकांची नावे आहेत.
मंगला आणि महेश या दोघांत प्रेमसंबंध असल्याची चर्चा होती. मंगला उमाटे हीचे शेत वणानाला परिसरात असलेल्या शिवारात आहे. मृतक मंगला मागील दोन वर्षांपासून बचतगटाचे काम करायची. १५ रोजी मंगला ही घरुन निघाली होती. रात्री उशिरापर्यंत ती घरी न आल्याने तिच पती राजेंद्र याने सेवाग्राम पोलिसांत मिसिंग तक्रार दाखल केली होती. मात्र, मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास मंगला आणि महेशचा मृतदेह मंगलाच्या मालकीच्या असलेल्या शेतातील विहिरीत तरंगताना नागरिकांना दिसून आले.
नागरिकांनी तत्काळ याची माहिती सेवाग्राम पाेलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जात मृतदेह विहरीबाहेर काढून उत्तरिय तपासणीसाठी सावंगी रुग्णालयात पाठविले. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार नीलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.