बॉयफ्रेंडशी बोलत होती अल्पवयीन तरुणी, ब्लॅकमेल करून घरमालक रोज करू लागला बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 04:11 PM2022-03-03T16:11:43+5:302022-03-03T16:12:17+5:30
Sexual Abuse Case : मिळालेल्या माहितीनुसार, लखनौमधील गोमती नगर पोलीस ठाण्यात राहणारी पीडित तरुणी तिच्या प्रियकराशी बोलत होती.
लखनौ पोलिसांनी अल्पवयीन मुलीचे शारीरिक शोषण करणाऱ्या घरमालकाला अटक केली आहे. आरोपीने तरुणीला प्रियकराशी बोलत असताना पकडून तिच्या वडिलांना सांगण्याच्या नावाखाली शारिरीक अत्याचार सुरु केला. त्रासलेली मुलगी आत्महत्या करणार होती, त्यानंतर तिने कुटुंबीयांच्या मदतीने गुन्हा दाखल केला.
मिळालेल्या माहितीनुसार, लखनौमधील गोमती नगर पोलीस ठाण्यात राहणारी पीडित तरुणी तिच्या प्रियकराशी बोलत होती. यादरम्यान घरमालक अतुल तिवारी याने पीडितेला प्रियकराशी फोनवर बोलताना पकडले, त्यानंतर त्याने वडिलांना आणि आईला सांगेन असे धमकावत तिला घरी ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली आणि दररोज घरी बोलावून तिचे शारीरिक शोषण करण्यास सुरुवात केली.
आरोपीने सतत पीडितेला ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार केला. त्याचे सतत शारीरिक अत्याचार होत होते. आरोपीच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून पीडित तरुणी आत्महत्या करणार होती, मात्र घरच्यांना माहिती मिळताच आरोपी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
एसीपी गोमती नगर स्वेता श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अतुल तिवारी हा यूनिजा हेल्थ केअर मेडिकल कंपनीमध्ये उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचा झोनल मॅनेजर आहे आणि पीडितेचा घरमालक आहे, तो अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करत होता आणि तिच्यावर बलात्कारही करत होता, पोलिसांनी गुन्हा नोंदवला. आरोपीला कारागृहात पाठवण्यात आले आहे.