मोबाईल दाखविण्याचा बहाणा करून अल्पवयीनाचा ८ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार

By गोपालकृष्ण मांडवकर | Published: February 10, 2024 03:54 PM2024-02-10T15:54:34+5:302024-02-10T15:56:30+5:30

आईवडील गेले होते कामावर; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

A minor sexually assaulted an 8-year-old girl on the pretext of showing her mobile phone | मोबाईल दाखविण्याचा बहाणा करून अल्पवयीनाचा ८ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार

मोबाईल दाखविण्याचा बहाणा करून अल्पवयीनाचा ८ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार

गोपालकृष्ण मांडवकर, लोकमत न्यूज नेटवर्क, भंडारा: शेजारच्या आठ वर्षाच्या बालिकेचे आई वडील कामावर गेल्याची संधी साधून एका १४ वर्षिय मुलाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. दोन दिवसांनी या बालिकेने आईला ही बाब सांगितल्यावर हा धक्कादायक प्रकार पुढे आला. पिडीत बालिकेच्या आईच्या तक्रारीवरून त्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाखनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात हा प्रकार घडला.

पिडीत बालिकेचे आईवडील मोलमजुरी करून कुटुंबाचा चरितार्थ चालवित. हे दोनही कुटूंब एकाच मोहोल्ल्यात एकमेकाच्या घरासमोर राहत असल्यामुळे ओळख आहे. पीडितेचे आई वडील मजुरीच्या कामाला गेल्यानंतर तो मुलगा त्यांच्या घरी जाऊन मुलांसह खेळत असतो. शुक्रवारी (दि. ९) सायंकाळी बालिकेची आई सायंकाळी कामावरून परतली असता बालिकेच्या वर्तनात बदल जाणवला. त्यामुळे विचारणा केली असता, आपल्यासोबत शेजारचा मुलगा विचित्र वागल्याचे त्या बालिकेने आईला सांगितले. आईने विश्वासात घेऊन बालिकेला विचारणा केली असता, मोबाईल दाखवितो असे सांगून त्या मुलाने दोन दिवसांपूर्वी बुधवारी (दि. ७) आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती तिने आईला दिली.

त्यावरून पिडीतेला सोबत घेऊन आईने लाखनी पोलिस ठाणे गाठून घटनेची तक्रार नोंदविली. घटनेचे गांभीर्य ओळखून लाखनी पोलिसांनी विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेऊन कलम ३७६ (ए,बी) भादंवि तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम-२०१२ चे सहकलम ४, ६, १२ अन्वये गुन्हा दाखल केला. दोघांच्याही वैद्यकीय तपासणीनंतर मुलाची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.

Web Title: A minor sexually assaulted an 8-year-old girl on the pretext of showing her mobile phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.