लाच घेण्यासाठी एपीआयची नवी शक्कल; कँटीन चालकासह तीन जणांवर एसीबीची कारवाई

By Appasaheb.patil | Published: January 11, 2023 08:52 PM2023-01-11T20:52:40+5:302023-01-11T20:53:17+5:30

ही कारवाई बुधवारी करण्यात आली. याप्रकरणी पांगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

A new look at the API for accepting bribes; ACB action against three people including canteen driver | लाच घेण्यासाठी एपीआयची नवी शक्कल; कँटीन चालकासह तीन जणांवर एसीबीची कारवाई

लाच घेण्यासाठी एपीआयची नवी शक्कल; कँटीन चालकासह तीन जणांवर एसीबीची कारवाई

Next

सोलापूर : गुन्ह्यामध्ये नॉमिनल अटक करून जामिनावर सोडण्यासाठी तीस हजार रुपयाची लाच घेणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकासह एक पोलीस शिपाई, कॅन्टीन चालकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई बुधवारी करण्यात आली. याप्रकरणी पांगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागनाथ जयजयराम खुणे (वय ३५ , सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी अधिकारी पांगरी पोलीस स्टेशन),  सुनिल पुरभाजी बोदमवाड (वय ३१, पोलीस शिपाई नेमणूक पांगरी पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण),  हसन इस्माइल सय्यद (वय ६९ व्यवसाय चहा कॅन्टीन रा. पांगरी ता. बार्शी जि. सोलापूर) असे कारवाई झालेल्या तिघांची नावे आहेत. 

यातील तक्रारदार यांचे व त्याच्या भावाविरुध्द पांगरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दाखल गुन्हयात तक्रारदार व त्यांचा भाऊ या दोघांचा न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे. सदर गुन्हयात नमुद तक्रारदार तसेच त्याच्या भावाला नॉमीनल अटक करुन जामीनावर सोडण्याकरिता गुन्हयाचे तपासी अधिकारी नागनाथ खुणे व त्यांचे सहकारी सुनिल बोदमवाड यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रत्येकी १५००० रुपये प्रमाणे ३०००० रुपये लाचेची मागणी केली होती. मागणी केलेली लाच रक्कम चहा कॅन्टीन चालक हसन सय्यद याच्याकडे देण्यास सांगितले. ही लाच स्वीकारल्याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले. 

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक गणेश कुंभार, पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार शिरीषकुमार सोनवणे, पोलीस नाईक प्रमोद पकाले, श्रीराम घुगे, पोकॉ सलीम मुल्ला, गजानन किणगी चापोना उडानशिव, चापोशि शाम सुरवसे सर्व नेमणूक एसीबी सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
 

Web Title: A new look at the API for accepting bribes; ACB action against three people including canteen driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.