धक्कादायक! कोलकात्यातील महिला डॉक्टरसारखाच उत्तराखंडमधील नर्सवर अत्याचार; बलात्कार करुन केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 10:29 AM2024-08-15T10:29:19+5:302024-08-15T10:30:21+5:30

Crime News : चार दिवसापूर्वी कोलकातामध्ये एका महिला डॉक्टरवर बलात्कार करुन हत्या केल्याची धक्कादायक बातमी आली होती. या सारखीच घटना आता उत्तराखंडमध्ये घडली आहे.

A nurse in Uttarakhand was assaulted similar to a woman doctor in Kolkata Raped and killed | धक्कादायक! कोलकात्यातील महिला डॉक्टरसारखाच उत्तराखंडमधील नर्सवर अत्याचार; बलात्कार करुन केली हत्या

धक्कादायक! कोलकात्यातील महिला डॉक्टरसारखाच उत्तराखंडमधील नर्सवर अत्याचार; बलात्कार करुन केली हत्या

Crime News : कोलकाता येथील महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर आता उत्तराखंडमध्येही असेच एक प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्याच्या सीमेवर सापडलेल्या नर्स तस्लीम जहाँ यांना मारहाण करून जखमी केली. यानंतर तिच्यावर बलात्कार केला होता, यानंतर स्कार्फने गळा आवळून तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. 

पोलिसांमी दिलेली माहिती अशी, तिच्या चेहऱ्यावर दगडाने हल्ला करून मृतदेह झुडपात लपवून ठेवला. हत्येनंतर आरोपी पैसे व मोबाईल घेऊन पसार झाला.  पोलिसांनी बुधवारी बरेली येथील आरोपीला राजस्थानमधून अटक करून या प्रकरणाचा पर्दाफाश केला.

चीनमध्ये मृतांच्या बाबतीतही भ्रष्टाचार; पैशांसाठी होतेय मृतदेहांची चोरी अन् विक्री

वसुंधरा एन्क्लेव्ह, डिबडीबा, बिलासपूर येथे राहणारी ३३ वर्षीय परिचारिका तस्लीम ३० जुलैच्या रात्रीपासून बेपत्ता होती. ती रुद्रपूर येथील एका खासगी रुग्णालयात परिचारिका होती, ती ड्युटी संपवून बाहेर पडली पण घरी पोहोचलीच नाही. या प्रकरणी तस्लीम जहाँच्या बहिणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी ३१ जुलै रोजी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवून तिचा शोध सुरू केला. गेल्या गुरुवारी डिबडीबा परिसरातील वसुंधरा एन्क्लेव्हच्या थोडे पुढे असलेल्या रिकाम्या प्लॉमृत व्यक्तीकडून चोरीला गेलेल्या मोबाईलचे लोकेशन बरेली येथे सापडले. त्याचा मोबाईल बरेली येथील रहिवासी धर्मेंद्र वापरत असल्याचे आढळून आले. त्यानंतर जेव्हा पोलिसांचे पथक बरेलीला पोहोचले तेव्हा तो कुटुंबासह फरार झाल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला राजस्थानमधून अटक केली.टमध्ये तस्लीम जहाँचा मृतदेह आढळला. 

चोरीला गेलेल्या मोबाईलचे लोकेशन बरेली येथे सापडले. तिचा मोबाईल बरेली येथील रहिवासी धर्मेंद्र वापरत असल्याचे आढळून आले. त्यानंतर जेव्हा पोलिसांचे पथक बरेलीला पोहोचले तेव्हा तो कुटुंबासह फरार झाल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला राजस्थानमधून अटक केली.

Web Title: A nurse in Uttarakhand was assaulted similar to a woman doctor in Kolkata Raped and killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.