सोशल मीडियावर तलवार, चॉपरसह फोटो व्हायरल करणे भोवले, शस्त्र जप्त; दोघे पोलिसांच्या ताब्यात

By विजय.सैतवाल | Published: March 2, 2024 11:44 PM2024-03-02T23:44:27+5:302024-03-02T23:45:17+5:30

तलवारीसह मिरवणुकीत नाचताना एका तरुणाचा फोटो व्हॉटस्‌ ॲप ग्रुपवर व्हायरल झाला होता.

A picture with a sword and a chopper went viral on social media; Both are in police custody | सोशल मीडियावर तलवार, चॉपरसह फोटो व्हायरल करणे भोवले, शस्त्र जप्त; दोघे पोलिसांच्या ताब्यात

सोशल मीडियावर तलवार, चॉपरसह फोटो व्हायरल करणे भोवले, शस्त्र जप्त; दोघे पोलिसांच्या ताब्यात

विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: तलवारीसह मिरवणुकीत नाचतानाचा फोटो व हातात चॉपर घेतलेला फोटो व्हायरल केल्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून शस्त्र जप्त करण्यात आले. या प्रकरणी दोघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तलवारीसह मिरवणुकीत नाचताना एका तरुणाचा फोटो व्हॉटस्‌ ॲप ग्रुपवर व्हायरल झाला होता. या प्रकरणी पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांनी गुन्हेशोध पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार सहाय्यक फौजदार उमेश भांडारकर, विजय निकुंभ, प्रफुल्ल धांडे, रतन गिते, तेजस मराठे, अमोल ठाकूर यांनी शाहूनगर पडकी शाळेच्या मागील गल्लीतून सर्फराज जावेद भिस्ती (२०) याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने मिरवणुकीत नाचवत असलेली तलवार  काढून दिली. त्याच्याविरुद्ध अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या सोबतच शाहूनगर परिसरातीलच सैय्यद आफताब सैय्यद ऐजाज (२४)याचा चॉपर हातात घेतलेला फोटो व्हॉटस्‌ॲप ग्रुपवर व्हायरल झाला होता. त्यालाही शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने शाहूनगरातून ताब्यात घेतले. त्याने चॉपर काढून दिला. या प्रकरणी किशोर निकुंभ यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाहूनगरात पाठोपाठ कारवाया

शाहूनगर परिसरातून गांजा, गुटखा जप्त करण्यात आला. त्या पाठोपाठ याच परिसरात तलवार व चॉपर सापडला. शहर पोलिसांनी या परिसरात कारवाई वाढवली आहे.

Web Title: A picture with a sword and a chopper went viral on social media; Both are in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव