धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 12:37 PM2024-09-29T12:37:57+5:302024-09-29T12:39:24+5:30

दिल्लीतील नांगलोई भागात एका पोलीस हवालदाराला कारने चिरडून १० मीटरपर्यंत फरपटत नेले.

A policeman was killed for asking him to drive properly; Incidents in Delhi | धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना

धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना

दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्ली पोलीस हवालदाराची कारने चिरडून हत्या केली आहे. कॉन्स्टेबलला १० मीटरपर्यंत फरपटत नेले घेऊन गेले आणि नंतर दुसऱ्या कारला धडक दिली.

मिळालेली माहिती अशी, हवालदाराने गाडी चालकाला हळू चालवण्यास सांगितले होते . याचा राग मनात धरुन एका चालकाने हवालदाराला फरपटत घेऊन गेला. ही घटना दिल्लीतील नांगलोई भागात शनिवारी रात् घडली.  पोलिसांनी कार ताब्यात घेतली असून आरोपी फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला

वीणा एन्क्लेव्हमध्ये पहाटे २.१५ वाजता ही घटना घडली. संदीप असे या कॉन्स्टेबलचे नाव असून तो नांगलोई पोलीस ठाण्यापासून रेल्वे रोडच्या दिशेने दुचाकीवरून जात होता. यावेळी त्यांना एका वॅगनर कारचा चालक बेदरकारपणे गाडी चालवताना दिसला. हवालदार संदीप त्याच्याजवळ गेले आणि त्याला गाडी नीट चालवायला सांगितली. मिळालेल्या माहितीनुसार, ड्रायव्हर इतका संतापला की त्याने अचानक आपल्या कारचा वेग वाढवला आणि पाठीमागून संदीप यांना धडक दिली आणि नंतर १० मीटरपर्यंत फरपटत घेऊन गेला.

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यात पोलीस संदीप एका रस्त्यावर डावीकडे वळताना दिसत आहेत. यानंतर आरोपीला कार स्पीड कमी करण्यासाठी सिग्नल देतात. त्यावर वॅगनरचा वेग अचानक वाढला, त्यानंतर ती संदीप यांच्या दुचाकीला मागून धडकली. त्यामुळे संदीप यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी बीएनएस कलम 103 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. कारमधून पळून गेलेल्या दोघांचा शोध सुरू आहे.

Web Title: A policeman was killed for asking him to drive properly; Incidents in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.