दुर्मिळ आजाराने ग्रस्त गर्भवती महिलेने दिला निरोगी बाळाला जन्म

By धीरज परब | Published: March 28, 2023 04:35 PM2023-03-28T16:35:04+5:302023-03-28T16:35:40+5:30

रुग्णाच्या शरीरातील खालच्या भागाला रक्तपुरवठा करणाऱ्या मुख्य धमनी अरुंद झाली होती. परिणामी, शरीराच्या खालच्या भागात रक्तपुरवठा कमी झाला होता.

A pregnant woman suffering from a rare disease gave birth to a healthy baby | दुर्मिळ आजाराने ग्रस्त गर्भवती महिलेने दिला निरोगी बाळाला जन्म

दुर्मिळ आजाराने ग्रस्त गर्भवती महिलेने दिला निरोगी बाळाला जन्म

googlenewsNext

मीरारोड - दुर्मिळ ताकायासुच्या आर्टेरिटिस असलेल्या २८ वर्षीय महिलेचे यशस्वी बाळंतपण करण्यात मीरारोड मधील एका खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांना यश आले आहे . त्या महिलेने २.४ किलो वजनाच्या निरोगी बाळाला जन्म दिला. 

भाईंदरला राहणारी गृहिणी गरोदर राहिल्याने खूश होती. मात्र तीन महिने होत नाही तोच तिला ताकायासु आर्टेरिटिस नावाची दुर्मिळ स्थिती आढळून आली. तिला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. तिला पुढे महाधमनी कोऑरक्टेशनचे (ज्यात ऱ्हदयाला पंपिगसाठी अधिक जोर द्यावा लागतो) निदान झाले. त्यामुळे गर्भधारणा तिच्यासाठी जीवघेणी ठरण्याची शक्यता पाहता तिला गर्भधारणा त्वरित थांबविण्याचा सल्ला दिला गेला होता .  

मीरारोडच्या वोक्हार्ट रुग्णालयाच्या  सल्लागार स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूतीतज्ज्ञ, लॅपरोस्कोपिक सर्जन डॉ. राजश्री तायशेटे - भासले यांनी सांगितले कि , गरोदरपणाच्या ९ महिन्यांत सदर रुग्ण आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात  दाखल झाली.  तिला उच्च रक्तदाब होता. तिला ताकायासु आर्टेरिटिस नावाची दुर्मिळ स्थिती होती जी रक्तवाहिन्यांचा दाहक रोग म्हणून ओळखला जातो. हा विकारांचा एक समूह आहे ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये दाह होतो, मुख्यतः महाधमनी प्रभावित होते.

काउंसिलिंगनंतर, कार्डियाक ऍनेस्थेसिया टीमसह निवडक एलएससीएस करण्यात आले. डॉ. रूपा मेपाणी आणि डॉ. केदारेश्वर पोटे यांनी सांगितले की, २.४ किलोचे बाळ जन्माला घालण्यात आम्हाला यश आले असून हे एक आव्हान होते. शस्त्रक्रियेनंतरचा तिला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले.  या स्थितीतील प्रसूती नेहमीच गुंतागुंतीची असते परंतु महिलेने चांगला प्रतिसाद दिला. स्ट्रोक, आकस्मिक मृत्यू, हृदयाचे कार्य बंद पडणे इत्यादी गुंतागुंत आढळून येतात. आता महिला पूर्णतः बरी झाली असून स्वतःच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे.  या गर्भधारणेमुळे माझ्या जीवाला  धोका आहे याची माहिती असून देखील बाळाला जन्म देण्याची इच्छा असल्याने गर्भधारणा न थांबविण्याचा निर्णय घेतला असे तिने सांगितले.  

तर रुग्णाच्या शरीरातील खालच्या भागाला रक्तपुरवठा करणाऱ्या मुख्य धमनी अरुंद झाली होती. परिणामी, शरीराच्या खालच्या भागात रक्तपुरवठा कमी झाला होता. साधारणपणे, अशी स्थिती असताना रुग्णांना गर्भधारणा थांबविण्याचा सल्ला देण्यात आला. परंतु या रुग्णाने गर्भधारणा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. अशा रूग्णांना सिझेरियन विभागाची आवश्यकता असते कारण त्योनीमार्गाद्वारे प्रसूती होऊ शकत नाही. ऍनेस्थेसिया देखील आव्हानात्मक होते. बाळ जन्मल्यानंतर अशा रुग्णांना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. ही शस्त्रक्रिया अघटित होती आणि आता रुग्णाला तिच्या मुख्य धमनी अरुंद करण्यासाठी उपचारांची आवश्यकता आहे ज्याला वैद्यकीय भाषेत महाधमनी कोऑर्टेशन म्हणतात असे कन्सल्टंट कार्डिओव्हस्कुलर आणि थोरॅसिक सर्जन डॉ. मयुरेश प्रधान म्हणाले . 

Web Title: A pregnant woman suffering from a rare disease gave birth to a healthy baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.