उसनवारीच्या वादावरुन डोक्यात रॉड टाकला

By देवेंद्र पाठक | Published: April 3, 2023 04:49 PM2023-04-03T16:49:54+5:302023-04-03T16:50:02+5:30

धुळे तालुक्यातील अंचाळे येथील घटना, चौघांवर गुन्हा

A rod was thrown in the head due to Usanwari dispute | उसनवारीच्या वादावरुन डोक्यात रॉड टाकला

उसनवारीच्या वादावरुन डोक्यात रॉड टाकला

googlenewsNext

धुळे : उसनवारीने दिलेले पैसे परत मागण्याच्या कारणावरुन वाद पेटला आणि शिवीगाळ करीत एकाला मारहाण करण्यात आली. लोखंडी रॉड डाेक्यात टाकल्याने इसमाला गंभीर दुखापत झाली. ही घटना धुळे तालुक्यातील अंचाळे गावातील बसस्थानकाजवळ शुक्रवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी चार जणांविरोधात शनिवारी तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

धुळे तालुक्यातील अंचाळे येथे राहणारे रमेश आंबू पवार (वय ३७) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, रमेश पवार यांनी काही जणांसोबत पैशांचा व्यवहार केलेला होता. दिलेले पैसे परत मिळत नसल्याने त्यांनी ते मागण्यासाठी तगादा लावला होता. पैसे मागत असल्यामुळे वाद निर्माण झाला. वाद विकोपाला गेल्याने शिवीगाळ करत हाताबुक्याने मारहाण करण्यात आली. चारही पैकी एकाने लोखंडी रॉड हातात घेऊन रमेश पवार यांच्या डोक्यात टाकला. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. ही घटना शुक्रवारी सायंकाळ साडेपाच वाजेच्या सुमारास धुळे तालुक्यातील अंचाळे गावातील बसस्थानक परिसरात घडली.

मारेकरी घटनेनंतर पसार झाले. जखमी अवस्थेत रमेश पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांनी धुळे तालुका पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दाखल केली. त्यानुसार, धुळे तालुक्यातील चिंचखेडे येथील चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक योगेश पाटील करीत आहेत.

Web Title: A rod was thrown in the head due to Usanwari dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.