शाळेच्या मैदानातून ५ हजारांच्या ड्रग्जसह सेल्समनला पकडले

By प्रदीप भाकरे | Published: November 6, 2023 07:25 PM2023-11-06T19:25:26+5:302023-11-06T19:25:48+5:30

एटीसी, नागपुरी गेट पोलिसांची कारवाई : एक अटक, दुसरा वान्टेड

A salesman was caught with drugs worth Rs 5,000 from the school grounds | शाळेच्या मैदानातून ५ हजारांच्या ड्रग्जसह सेल्समनला पकडले

शाळेच्या मैदानातून ५ हजारांच्या ड्रग्जसह सेल्समनला पकडले

अमरावती : एका सेल्समनकडून पाच हजारांची एमडी ड्रग्स व ६० हजारांचा मोबाइल जप्त करण्यात आला. नागपुरी गेट पोलीस व गुन्हे शाखेतील दहशतवाद विरोधी कक्षाच्या पथकाने ४ नोव्हेंबर रोजी उशिरा रात्री नागपुरी गेट भागातील ॲकेडमिक शाळेच्या पटांगणात ही कारवाई करण्यात आली. फिरोज खान सैफुल्ला खान (२७, साबनपुरा) व अल्तमश गफ्फार (२०, रा. अन्सार नगर, गवळीपुरा रोड, अमरावती) अशी आरोपींची नावे आहेत.           

फिरोजखान याला ॲकेडमिक शाळेच्या पटांगणातून अटक करण्यात आली. त्याच्याच ताब्यातून पाच हजार रुपये किमतीची २.६३० ग्रॅम एमडी व मोबाइल जप्त करण्यात आला. ती एमडी अल्तमश गफ्फार याची असून, ती त्याने आपल्याकडे विक्रीकरिता दिल्याची कबुली फिरोजखान याने दिली. त्यानुसार त्यालादेखील आरोपी करण्यात आले. ४ नोव्हेंबर रोजी सहायक पोलीस निरीक्षक योगेश इंगळे यांना ॲकॅडेमिक ग्राउंडवर फिरोज खान नावाचा इसम हा एमडी नावाचा अमली पदार्थ लोकांना विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यासाठी नागपुरी गेट पोलीस ठाणे व तेथील डीबी पथकाची मदत घेण्यात आली.

यांनी केली कारवाई

पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त पूनम पाटील यांच्या मार्गदर्शनात नागपुरीगेटचे ठाणेदार अनिल कुरळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेकानंद राऊत, सहायक पोलीस निरीक्षक योगेश इंगळे, उपनिरीक्षक सुशील कोडापे, महेंद्रसिंह येवतीकर, अंमलदार अशोक वाटाणे, मंगेश लोखंडे, संजय भारसाकळे, शंकर बावनकुळे, आशिष करपे, आनंदसिंग ठाकुर, रणजित गावंडे, रियाज खान, शेख आबीद, प्रवीण पोकळे, प्रवीण पुनोते, अमोल मोहोड, राहुल रोडे व आबीद यांनी ही कारवाई केली.

Web Title: A salesman was caught with drugs worth Rs 5,000 from the school grounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.