साताऱ्यात शाळकरी मुलीची आत्महत्या, राहत्या घरात घेतला गळफास
By दत्ता यादव | Published: October 24, 2022 07:57 PM2022-10-24T19:57:35+5:302022-10-24T20:03:57+5:30
दिवाळीची सुट्टी असल्याने श्रावणी घरीच होती, पण अचानक...
लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: येथील शाहूपुरीतील प्रणोती पार्कमध्ये राहणाऱ्या नववीतील एका शाळकरी मुलीने घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना रविवार, दि. २३ रोजी सकाळी अकरा वाजता घडली. श्रावणी अतूल काटकर (वय १५) असे आत्महत्या केलेल्या शाळकरी मुलीचे नाव आहे.
याबाबत शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साताऱ्यातील एका शाळेमध्ये नववी इयत्तेत श्रावणी शिकत होती. काही दिवसांपूर्वी तिच्या शाळेला दिवाळीची सुटी लागल्याने ती घरीच होती. रविवार, दि. २३ रोजी सकाळी तिने राहत्या घरात अचानक गळफास घेतला. हा प्रकार तिच्या घरातल्यांच्या निदर्शनास आल्यानंतर तिच्या गळ्याचा फास सोडवून तातडीने तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. श्रावणीने कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप समोर आले नाही. तिच्या आत्महत्येमुळे तिच्या आर्इ-वडिलांना जबर मानसिक धक्का बसला आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, हवालदार सचिन माने हे अधिक तपास करीत आहेत.