OYO वरून रूम बुक, दोघांनी ओळखपत्र दिलं; काही वेळेनंतर मुलीची तब्येत खालावली, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 06:14 PM2022-12-18T18:14:40+5:302022-12-18T18:22:34+5:30
OYO हॉटेलच्या खोलीत एका मुलीचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली: हरियाणातील सोनीपत बहलगढ येथील OYO हॉटेलच्या खोलीत एका मुलीचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
महिला तुरुंग अधिकारी कैद्याच्या प्रेमात; किसच्या बदल्यात..., अधिकारीही पडले बुचकळ्यात!
तरुणी एका तरुणासोबत हॉटेलमध्ये गेली होती. दोघांनी ओळखपत्रही दिले होते. यानंतर दोघंही खोलीत गेले. मात्र काही वेळाने मुलीची प्रकृती खालावली आणि तिचा मृत्यू झाला. सदर प्रकार घडताच हॉटेलचालकाने बहलगढ पोलिस ठाण्यात या प्रकरणाची माहिती दिली.
आफताब पुरता अडकला; श्रद्धाच्या जंगलात सापडलेल्या हाडांनी भक्कम पुरावा दिला...!
पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर हॉटेलमध्ये दिलेल्या तरुणीचे ओळखपत्र चुकीचे आढळून आले. हॉटेलची खोली घेताना वापरलेला ओळखपत्र मुलीचा नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी आमची मागणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी केली आहे.
शरीरावर जखमेच्या खुणा नाहीत-
या संपूर्ण प्रकरणाबाबत बहलगड पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक ऋषिकांत यांनी सांगितले की, तरुणी एका तरुणासोबत ओयो हॉटेलमध्ये गेली होती. खोलीतच तिचा मृत्यू झाला. शरीरावर जखमेच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत.
अहवालाच्या आधारे कारवाई केली जाईल-
शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे सांगितले. मुलीच्या कुटुंबीयांचे म्हणणे आणि शवविच्छेदन अहवालाच्या आधारे कारवाई करण्यात येईल, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"