आईच्या गळ्यावर चाकू ठेवून वडिलांचे खाते रिकामे; बांगड्यांसहित कोट्यवधींची लूट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 07:34 AM2023-01-12T07:34:12+5:302023-01-12T07:34:27+5:30

याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी मुलगा राहुल दौंडकर (वय २४) याला अटक केली आहे. 

A shocking incident took place in Bandra where the boy himself robbed the mother's jewelery along with the bank deposit at knifepoint. | आईच्या गळ्यावर चाकू ठेवून वडिलांचे खाते रिकामे; बांगड्यांसहित कोट्यवधींची लूट

आईच्या गळ्यावर चाकू ठेवून वडिलांचे खाते रिकामे; बांगड्यांसहित कोट्यवधींची लूट

Next

- मनीषा म्हात्रे 

मुंबई : वृद्धापकाळात आधार ठरण्याऐवजी मुलानेच चाकूच्या धाकात आईच्या दागिन्यांसह  बँकेतील जमापुंजी लुटल्याची धक्कादायक घटना वांद्रेत घडली. यात त्यांची सव्वा कोटींना फसवणूक झाली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी मुलगा राहुल दौंडकर (वय २४) याला अटक केली आहे. 

वांद्रे परिसरात ६६ वर्षीय दौंडकर दाम्पत्य राहण्यास आहे.  दौंडकर हे व्यावसायिक आहेत. मंगळवारी रात्री राहुलने एनईएफटीद्वारे वडिलांना पैसे ट्रान्स्फर करण्यास सांगितले. नकार देताच, त्याने आईच्या गळ्यावर चाकू ठेवून जिवे मारण्याची धमकी दिली. अखेर, वडिलांनी त्यांच्या खात्यातील सर्व पैसे ट्रान्स्फर केले . तब्बल एक कोटी ३७ हजार रुपये ट्रान्स्फर केले. तसेच, राहुलने आईच्या सोन्याच्या १२ बांगड्या, देवांचे दागिने असा एकूण एक कोटी १४ लाख ८७ हजार रुपयांच्यावर ऐवज घेऊन गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या प्रकारामुळे दोघांनाही धक्का बसला असून, दौंडकर यांनी तत्काळ पोलिसांना कॉल करून घटनेची माहिती दिली. घटनेची वर्दी लागताच वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्व परिस्थितीचा आढावा घेतला.  याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत राहुलला अटक केली आहे. तो सध्या पोलिस कोठडीत आहे. आरोपांबाबत सखोल तपास करत त्याने असे का केले? याबाबत अधिक चौकशी सुरू असल्याचे वांद्रे पोलिसांनी सांगितले.

Web Title: A shocking incident took place in Bandra where the boy himself robbed the mother's jewelery along with the bank deposit at knifepoint.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.