तांत्रिकाने जळत्या चितेतून मृतदेह काढला बाहेर, शिरच्छेद करून घरी नेले; तंत्रमंत्र करणार होता तितक्यात...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 09:26 PM2022-07-27T21:26:47+5:302022-07-27T21:27:41+5:30

Crime News : तेथे पोलिसांनी आरोपीच्या घरातून छिन्नविछिन्न शीर जप्त करून दोन आरोपी तांत्रिकांना अटक केली.

A tantrik took the body out of the burning pyre, decapitated it and took it home; As soon as he was about to do Tantramantra... | तांत्रिकाने जळत्या चितेतून मृतदेह काढला बाहेर, शिरच्छेद करून घरी नेले; तंत्रमंत्र करणार होता तितक्यात...

तांत्रिकाने जळत्या चितेतून मृतदेह काढला बाहेर, शिरच्छेद करून घरी नेले; तंत्रमंत्र करणार होता तितक्यात...

Next

शाहजहांपूर : उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये तंत्र मंत्राचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तंत्र-मंत्राच्या नावाखाली एका तांत्रिकाने जळत्या चितेतून मृतदेह बाहेर काढला आणि त्याचा शिरच्छेद करून घरी गेला. चितेतून मृतदेह गायब झाल्याचे वृत्त समजताच नातेवाइकांनी पोलिसांसह तांत्रिकाच्या घरावर छापा टाकला, तेथे पोलिसांनी आरोपीच्या घरातून छिन्नविछिन्न शीर जप्त करून दोन आरोपी तांत्रिकांना अटक केली.

शाहजहांपूरमध्ये तंत्रमंत्राचे एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. एका तांत्रिकाने जळत्या चितेतून मृतदेह बाहेर काढला आणि त्याचा शिरच्छेद करून तो आपल्या घरी नेल्याचा आरोप आहे. या घटनेची माहिती मृताच्या कुटुंबीयांना समजताच त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तंत्र-मंत्रासाठी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. हे प्रकरण ठाणे तिल्हार येथील पिप्रौली गावचे आहे, जिथे वृद्ध कुबेर गंगवार यांचे आजारपणाने निधन झाले. नातेवाइकांनी गावाबाहेर मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आणि घरी परतले.

जळत्या चितेतून मृतदेह काढून शिर कापले
यानंतर गावातील गोपी आपल्या दोन साथीदारांसह तेथे पोहोचला आणि जळत्या चितेतून मृतदेह बाहेर काढला आणि धारदार शस्त्राने मृतदेहाचे मुंडके कापले. यानंतर गोपीने कापलेले शिर पेंढ्यात लपवले. दरम्यान, गावातील एका व्यक्तीने गोपीचे हे कृत्य पाहिले. ही बाब त्यांनी गावकऱ्यांना सांगितल्यावर संपूर्ण गावात हा प्रकार पसरला. मृताचे नातेवाईक गावकऱ्यांसह त्याच्या घरी पोहोचले, तेथे वादानंतर गोंधळ सुरू झाला. गोंधळानंतर नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली, पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी गोपी आणि त्याच्या साथीदाराला अटक केली.

पोलिसांनी त्याच्या घरातून छिन्नविछिन्न शिर जप्त केले आहे. चौकशीत गोपीचे वडील तावीज बनवण्याचे काम करतात तसेच तंत्र मंत्राचेही काम करतात. त्यांच्या सांगण्यावरून दोघांनी मृतदेहाचे शिर कापलं जेणेकरून शिराचा वापर करून तंत्र मंत्राचा प्रयोग केला जाऊ शकतो. 

Web Title: A tantrik took the body out of the burning pyre, decapitated it and took it home; As soon as he was about to do Tantramantra...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.