दहा वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या; तलासरीत क्रूरतेचा कळस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 09:19 AM2023-03-03T09:19:58+5:302023-03-03T09:20:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तलासरी : तालुक्यात १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून गळा दाबून तिची हत्या झाल्याची क्रूर घटना ...

A ten-year-old girl was raped and killed; brutality in Talasari | दहा वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या; तलासरीत क्रूरतेचा कळस

दहा वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या; तलासरीत क्रूरतेचा कळस

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
तलासरी : तालुक्यात १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून गळा दाबून तिची हत्या झाल्याची क्रूर घटना उघड झाली आहे.  आरोपीने मुलीचा मृतदेह गुजरातमध्ये नेऊन टाकल्याची कबुली दिली आहे. 

आरोपी रमेश डाह्या दुबळा (वय ४५, रा. डोंगारी दुबलपाडा) याने बुधवारी संजना शांतू कान्हात (वय १०) हिचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिचा गळा दाबून हत्या केली. ही घटना तलासरी तालुक्यात डोंगारी येथे घडली. तलासरी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत उपलब्ध माहिती आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे दुबळा याला अटक केली. दुबळा मुलीच्या शेजारी राहतो. घरगुती वादातून तिची हत्या केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. मच्छीमार बोटीवर जाण्यासाठी घेतलेले पैसे व आर्थिक देवाण-घेवाणीवरूनही त्यांचे वाद होते, असे बोलले जात आहे. वाद झाल्याचा राग मनात धरून दुबळा याने संजना बुधवारी सकाळी शाळेत जात असताना शाळेत सोडतो असे  सांगून मोटारसायकलवरून घेऊन गेला, मात्र तिला शाळेत न सोडता १०  ते १५ किलोमीटर लांब गुजरातमध्ये घेऊन  गेला. गुजरातमधील भिलाड-संजण रस्त्यावरील जंगलातील झाडाझुडपात  त्याने तिच्यावर बलात्कार केला व त्यानंतर गळा दाबून खून केला, अशी कबुली त्याने पोलिसांकडे दिली. 

मुलगी घरी न आल्यामुळे बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास नातेवाईक, आई-वडिलांनी पोलिसांकडे धाव घेतली. तलासरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय वसावे यांच्या नेतृत्वाखाली चार पथके तयार करण्यात आली होती.

दुबला याने अल्पवयीन मुलीचा बलात्कार करून गळा दाबून खून करून मृतदेह जंगलात झाडाझुडपात अडचणीच्या ठिकाणी लपवून ठेवला होता. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तलासरी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

Web Title: A ten-year-old girl was raped and killed; brutality in Talasari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.